Solapur : भाजपचे ‘संकटमोचक’ मंत्री गिरीश महाजनांसह तीन मंत्र्यांनी सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. पण सरकारची शिष्टाई दुसऱ्यांदा असफल ठरली. जरांगे उपोषणावर ठाम आहेत. मराठा आरक्षणाच्या विलंबनाला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे खासदार उदयनराजे यांनी सोलापुरात केला. "राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही," असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होते की मराठा आरक्षण तीन महिन्यात करण्यात येईल. पण ते झाले नाही, याला वरिष्ठ अधिकारीच जबाबदार आहेत. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी काम करणार नसतील तर त्यांच्या बदल्या मंत्रालयाच्या बाहेर कराव्यात, असा जीआर काढण्यात यावा," असे उदयनराजे म्हणाले.
"आजकाल अधिकाऱ्यांना भीती राहिली नाही, मंत्रालयात त्यांच्या या इमारतीमधून त्या इमारतीत बदल्या केल्या जातात. त्यामुळे कार्यक्षम अधिकाऱ्यांना ही जबाबदारी सोपवली असती तर त्यांनी ते काम केले असते. अधिकाऱ्यांनी जर काम केले असते तर जरंगे पाटलांवर उपोषणाची वेळ आली नसती," असे उदयनराजेंनी नमूद केले.
उदयराजेंनी नेत्यांना सुनावले...
खासदार उदयनराजे म्हणाले, "मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहेत, त्यातील त्रुटी भरून काढण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले तरच आरक्षण नक्की टिकेल. केंद्राच्या पातळीवर वाढ होईल, त्यासाठी बसून तोडगा काढावा," "मराठा आरक्षणाचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही," असे उदयराजे यांनी नेत्यांना अप्रत्यक्षपणे सुनावले.
"मराठा समाजातील मुला-मुलींना अधिकाधिक सुविधा द्याव्यात, त्यांच्या नोकरी व व्यवसायासाठी सरकारने प्रयत्न व्हावे. ही सरकारची जबाबदारी आहे. एका दिवसात मराठा आरक्षणाचा जीआर निघू शकत नाही. याबाबत काढलेला जीआर कोर्टात टिकला पाहिजे," असे ते म्हणाले.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.