Narendra Modi, Eknath Shinde, Vijay Wadettiwar News Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar News : ''काँग्रेसच भारी होती भाऊ... पुढे काँग्रेसलाच साथ देऊ''

उत्तम कुटे

Congress News : कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा सध्या विदर्भात आहे. तीत पक्षाचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी रिक्षामधून प्रवास केला. तसेच चहाच्या टपरीवर ते चहाही पिले. ही संधी साधून त्यांनी रेल्वे स्टेशनवर चहा विकला आणि ठाण्यात रिक्षा चालविल्याचा दावा केलेले पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सीएम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर अचूक टीकेचे बाण सोडले.

विशेष म्हणजे मोदी आणि शिंदेचे नाव न घेता त्यांच्यावर वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) आसूड ओढले. चहा विकणारा एक सर्वसामान्य व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला. ऑटोरिक्षा चालवणारा सामान्य माणूस आपल्या राज्याचा मुख्यमंत्री झाला. दोघेही देशाच्या आणि राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचले. पण, त्यांनी कधी तो व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा विचार केला नाही. त्यांच्या समस्या काय, मागण्या काय हे जाणून घेण्यासाठी कधी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली नाही, असे बोचरी टीका वडेट्टीवारांनी केली.

साखर, गॅस, पेट्रोल तेलाच्या किमती वाढवून कष्टकऱ्यांची पिळवणूक कशी करता येईल असेच निर्णय दोघांनी घेतले, असा हल्लाबोल त्यांनी केला. चहा विकून, ऑटोरिक्षा चालवून, टपरी लावून स्वतःचा उदनिर्वाह करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या भेटी एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून विदर्भातील जनसंवाद यात्रेदरम्यान घेतल्या.

त्यांचे दुःख, समस्या जाणून घेतल्या. त्या वेळी त्यांनी काँग्रेसच भारी होती भाऊ... पुढे काँग्रेसलाच साथ देऊ अशी भावना व्यक्त केली, असा दावा वडेट्टीवारांनी रिक्षाप्रवासाचा आणि टपरीवर चहा पितानाचा व्हिडिओ ट्वीट करीत केला. त्यातून त्यांनी मोदी आणि शिंदेवर निशाणा साधला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT