Dahihandi News : आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या दहीहंडीला गालबोट; लाकडी स्तंभ कोसळ्याने ६ गोविंदा जखमी

Mla Narendra Bhondekar News : लाकडी स्तंभ कोसळ्याने ६ गोविंदा जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Bhandara News
Bhandara NewsSarkarnama
Published on
Updated on

Dahihandi Celebration News : दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांच्या वतीने दहीहंडीच्या कार्यक्रमाचे भव्यदिव्य असे आयोजन दसरा मैदान येथे रविवारी करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला गालबोट लागले असून, दहीहंडी फोडताना गोविंदा दहीहंडी बांधलेल्या दोराला लटकल्याने दोर बांधलेला एक लाकडी स्तंभ अचानक कोसळला. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. लाकडी स्तंभ कोसळून तो उपस्थित गोविंदांच्या अंगावर पडणार तोच पळापळ झाली. मात्र, यात ६ गोविंदा जखमी तर १ गोविंदा फ्रॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार भोंडेकर यांच्या वतीने आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. दहीहंडीच्या या कार्यक्रमासाठी ३ दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात येत होती. दहीहंडी बांधण्यासाठी अंदाजे ५० फुटांवर दोर बांधलेला होता. त्यासाठी दोन्ही बाजूंनी लाकडी स्तंभ उभारण्यात आले होते. मात्र, आज सायंकाळी ८ .३० वाजताच्या सुमारास एक लाकडी स्तंभ अचानक कोसळल्याने या ठिकाणी गोविंदांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतीही काळजी घेण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट होते.

Bhandara News
Dhananjay Munde On Jitendra Awhad : मुश्रीफांनी मिठी मारली तर बरगड्या जागेवर राहतील का ? आव्हाडांना मुंडेंचा टोला..

मुळात सायंकाळी सुरू होणारा कार्यक्रम पाहुण्यांच्या उशिरा आगमनाने लांबला. त्यात पावसामुळे मैदानात पूर्णतः चिखल झालेला होता, असे असताना यात सहभागी होणाऱ्या गोविंदांची काळजी आणि सुरक्षितता अत्यंत महत्वाची असते. मात्र, याकडे आयोजकांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या घटनेत भंडारा (Bhandara) नशा मुक्ती पथकाचे ६ गोविंदा जखमी झाले असून १ गोविंदा फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले जात आहे.

दहीहंडी कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या लाकडी स्तंभावर जाड दोरखंड, त्याला फुलांच्या माळा लावण्यात आल्या. मधोमध दहीहंडी लावण्यात आली होती. तसेच त्यावर हॅलोजन लाईट सुद्धा लावण्यात आले होते. दरम्यान, दोन गोंविंदा पथकांनी मिळून पाच ते सहा थर लावले होते. गाण्यावर सर्वजण थिरकत असताना, स्टेजच्या उजव्या बाजूचा लाकडी स्तंभ अचानक गोंविंदा पथकांच्या अंगावर कोसळल्याने, काही गोविंदा जखमी झाले.

Bhandara News
Uddhav Thackeray On CM Eknath Shinde : ऋषी सुनक काय बोलले ते कळलं का ? ठाकरेंचा टोला..

त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी, प्रसंगी आयोजक व पोलिस (Police) प्रशासन आणि उपस्थितांची तारांबळ उडाल्याचे दृश्य होते. दरम्यान, आयोजकांनी प्रोग्राम थांबविला व कार्यक्रम संपल्याचे सांगण्यात आले. घटना रात्री ८.२५ च्या सुमारास घडली असून ही दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com