Local Body By Poll Election Sarkarnama
विदर्भ

Local Bodies By Election : इच्छुकांना मोठा धक्का; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांना न्यायालयाची स्थगिती

Chandrashekhar Bawankule News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती.

Rajesh Charpe

Nagpur News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणुका घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असल्याने ही स्थगिती देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तीन आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर स्थानिक स्वराज्य संस्थेतील रिक्त झालेल्या जागांसाठीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

विशेष म्हणजे रामटेकचे नवनिर्वाचित खासदार यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या टेकाडी सर्कलमध्ये निवडणूक जाहीर झाली होती. यास जिल्हा परिषदेचे सदस्य सलील देशमुख, रश्मी बर्वे, मनोज वंजारी, उद्धव हागे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वांच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली.

निवडून येणाऱ्या सदस्यांना तीनच महिन्यांचा सक्रिय कालावधी मिळणार आहे. त्यामुळे, या निवडणुका घेणे हे जनतेच्या पैशाची नासाडी असून त्या घेऊ नयेत, अशी विनंती या चारही याचिकांमार्फत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या टेकाडी सर्कलमध्ये निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

रश्मी बर्वे या रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार होत्या. या दरम्यान त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले होते. त्यामुळे त्यांना निवडणूक लढता आली नाही. या निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने जात पडताळणी समितीच्या निर्णयास अंतरिम स्थगिती दिली आहे, असे असताना निवडणूक कशी जाहीर केली जाऊ शकते अशी विचारणा रश्मी बर्वे यांनी आपल्या वकिलामार्फत केली होती.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीसुद्धा राज्यात पावसाचे थैमान सुरू आहे, नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे, पावसाळ्यात शेतकरीसुद्धा व्यस्त असतो असे सांगून पोटनिवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT