Local body elections Maharashtra Sarkarnama
विदर्भ

Local body elections Maharashtra : माजी नगरसेवक उरलेत फक्त 'पोस्टमन'च्या कामाचे! निवडणूक लांबल्यानं सर्वच वैतागले

Delay in Local Body Elections Frustrates Aspirants in Nagpur and Across Maharashtra : भाजपने आपल्या सर्व माजी नगरसेवकांना आपआपली कार्यालये सुरू ठेवा आणि लोकांच्या संपर्कात राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Rajesh Charpe

Nagpur civic polls delay : नागपूर महापालिकेचा कार्यकाळ संपूण सुमारे साडेतीन वर्ष लोटले आहे. निवडणूक प्रक्रियेला सुरवात झाली आहे. मात्र ती केव्हा होईल, याची खात्री कोणालाचा नाही. त्यातच भाजपने आपल्या सर्व माजी नगरसेवकांना आपआपली कार्यालये सुरू ठेवा आणि लोकांच्या संपर्कात राहण्याचे निर्देश दिले आहेत.

यात निवडणूक लांबतच चालल्या आहेत. त्यामुळे आणखी किती दिवस लोकांच्या तक्रारी ऐकायच्या, अशी विचारणा आता ते करू लागले आहेत. महापालिकेचे अधिकारी ऐकत नाही, नगरसेवकांना अधिकार नाही, फक्त पोस्टमनचे काम करावे लागत असल्याने माजी नगरसेवक चांगलेच वैतागले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या (Court) आदेशानंतर लवकरच निवडणुका होतील असा अंदाज वर्तविला जात होता. त्यानंतर राज्य शासनाने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे नोटीफिकेशन काढल्याने इच्छुकांचा उत्साह वाढला होता. चार सदस्यांचा प्रभागाची रचना करण्याचे निर्देश सध्या महापालिकांना देण्यात आले आहे.

महापालिकेच्या निवडणुकांकरिता निश्चित कालावधी आखून दिला होता. मात्र अलीकडे यास आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. डिसेंबर महिन्यात नागपूरमध्ये (Nagpur) हिवाळी अधिवेशन असते. हे बघता जानेवारी महिन्यात निवडणूक घोषित होईल असा अंदाच बांधला जात आहे. हे बघतचा आणखी सहा ते सात महिने निवडणुकीची प्रतीक्षा इच्छुकांना करावी लागणार आहे.

दरम्यान, भाजपने यावेळी नागपूरमध्ये 130 जागा जिंकण्याचा संकल्प सोडला आहे. 'ग्यारह साल मोदी सरकार, बेमिसाल', या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपने विविध कार्यक्रमांचा धडका लावला आहे. छोट्या मोठ्या सभा घेतल्या जात आहे. त्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोचवण्याचे काम सुरू केले आहे.

भाजपचे माजी नगरसेवक आणि इच्छुकांना कार्यालये सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांची कामे महापालिकेच्या प्रशासनापर्यंत पोहचवा, ती करून द्या असे ठणकावून सांगण्यात आले आहे. महापालितेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना जो सक्रिय राहील त्यांच्याच नावावर विचार केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.

यासाठी अनेकांनी कार्यालये सुरू ठेवली आहे. रोज येणाऱ्या तक्रारांनी ते ज जाम वैतागले आहेत. महापालिकेचे अधिकारी ऐकत नाही, माजी नगरसेवकांना अधिकार नाही त्यामळे फक्त पोस्टमनचे काम करावे लागत आहे. पक्षाचा आदेश असल्याने नकारही देता येत नाही अशी अवस्था भाजपसह सर्वच माजी नगरसेवकांची झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT