Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस पत्ते खोलेना... भाजपनंतरच उघड करणार उमेदवाराचे नाव !

Nana Patole : आमदार नाना पटोले यांचे गृहक्षेत्र असल्यामुळे येथील उमेदवाराची घोषणा शेवटच्या क्षणी करण्याची शक्यता अधिक आहे.

अभिजीत घोरमारे

Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणूकपूर्व माहौल रंगात आला आहे. पुढील आठवड्यात आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता आहे. भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून भंडाऱ्यातून कोणाला संधी मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. दरम्यान, भाजपने उमेदवार घोषित केल्यानंतरच काँग्रेस भंडारा-गोंदिया मतदारसंघाचा उमेदवार घोषित करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर भाजपची दुसरी यादी लवकरच जाहीर होणार असून या यादीत विदर्भातील उमेदवारांची नावे असण्याची शक्यता आहे. काँग्रेसने देशात आपले उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. आमदार नाना पटोले यांचे गृहक्षेत्र असल्यामुळे येथील उमेदवाराची घोषणा शेवटच्या क्षणी करण्याची शक्यता अधिक आहे. लोकसभेसाठी काँग्रेसने अर्ज मागविले होते. त्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासह 12 इच्छुकांनी अर्ज केले होते.

यात महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर या एकमेव महिलेचा समावेश होता. यात नाना पटोले यांचा अर्जाचा समावेश त्यात नव्हता, हे विशेष. भंडारा व वर्धा लोकसभेची उमेदवारी आमच्या समाजाला द्या, अन्यथा विदर्भातील दहाही उमेदवार पाडू, असा निर्धार लाखनीत आयोजित मेळाव्यात विदर्भ तेली महासंघाने केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गत विधानसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार चरण वाघमारे यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे विदर्भातील तेली बांधवांनी आपला निर्णय निकालातून दाखवून दिला होता. या पार्श्वभूमीवर तेली समाजाने समाजजागृती केली आहे.

पक्ष कोणताही असो उमेदवारी दिली नाही तर पराभव करू, अशी गर्जना तेली समाजाने केल्यानंतर आता कुणबी समाजही एकवटला आहे. हे सर्व घडत असताना काँग्रेस मात्र मूग गळून गप्प बसलेली आहे. मुंबईत बैठकांचा सपाटा लागला असला तरी काँग्रेस उमेदवार सांगायला तयार नाही. जिल्ह्यातील काँग्रेसला काँग्रेसच्या नेते पदाधिकाऱ्यांना विचारलं असता, इच्छुकांची यादी सांगून वेळ मारून नेली जात आहे.

नाना पटोले हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांना लोकसभा लढण्यात स्वारस्य नसल्याचे सध्यातरी दिसत आहे. ज्यांना उमेदवारी देतील त्यांना निवडून आणण्यासाठी आमदार पटोलेंना जिवाचे रान करावे लागणार आहे. कारण उमेदवार कुणीही असला तरी भाजप विरुद्ध नाना पटोले, अशीच लढत राज्यात रंगणार आहे. त्यामुळे उमेदवारी देताना जातिनिहाय प्राबल्य, लोकाभिमुख चेहऱ्याच्या ते शोधात आहेत. ऐनवेळी अन्य पक्षातील बलाढ्य उमेदवार आणून त्यांना उमेदवारी दिली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT