Nana Patole : ‘औकात’वरून भिडले नाना; प्रफुल पटेलांना दिले थेट आव्हान !

Praful Patel : विकासकामे आणण्यात कोणाची काय 'औकात', असा टोला प्रफुल पटेलांनी जाहीर सभेत नाना पटोले यांचे नाव न घेता लगावला होता.
Nana Patole and Praful Patel
Nana Patole and Praful PatelSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात काल (ता. 7)पासून उठलेलं ‘औकाती’चं राजकारण आज (ता. 8) अधिक पेटलं आहे. काल गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्यात खासदार प्रफुल पटेल यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव न घेता विकासकामांवरून नानाची औकात काढली होती. त्याचे प्रत्युत्तर देत नानांनी औकातीवरून प्रफुल पटेलांना आव्हान दिले आहे.

आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत उभे व्हा, तुम्हाला तुमची औकात कळेल, असा थेट इशारा दिला आहे. दरम्यान, 'पाठीत खंजीर खुपसला' हा एपिसोड पाहिल्यानंतर आता ‘पटोले विरुद्ध पटेल’ वादाचा 'औकाती'वरून दुसरा अंक भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनतेला पाहायला मिळणार आहे.

मोठा नेता म्हणून जिल्ह्यात एका नेता फिरत असून, आपल्या तालुक्याचा विकास न करू शकणारे जिल्ह्यात काय कामे केली ते सांगा, कोण किती काम करतो आणि विकासकामे आणण्यात कोणाची काय 'औकात', असा टोला प्रफुल पटेलांनी जाहीर सभेत नाना पटोले यांचे नाव न घेता लगावला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole and Praful Patel
Nana Patole : ‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड

आज (8 मार्च) महाशिवरात्रीनिमित्त गोंदियाच्या मोरगाव अर्जुनीतील प्रतापगड यात्रेत सहभागी झाल्यावर माध्यम प्रतिनिधींना नानांनी याबाबत प्रश्न केला. त्यावरून नानांनी तुमची औकात पाहायची असेल तर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरा. मोदी आणि शाहाच्या मांडीला मांडी लावून बसणारे लोक आता तुमची कुंडली माझ्याजवळ असल्याची धमकी देत धमकावत आहेत. ज्या नेत्यांना इतका घमेंड आलाच असेल तर त्यांनी एकदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरावे, मग लोकच त्यांना त्यांची औकात दाखवतील, असे म्हणत त्यांनी केलेलं वक्तव्य लज्जास्पद असल्याचे नाना म्हणाले.

पटेल मोदी-शाहांची भाषा बोलताहेत

जिल्ह्यातील आजी-माजी आमदार-खासदारांची कुंडली माझ्याकडे आहे, असा थेट इशारा प्रफुल पटेल यांनी काल (7 मार्च) मेळाव्याला मार्गदर्शन करताना दिला होता. पटेल म्हणाले होती की, तुम्ही कोणालाही खासदार निवडा मात्र कामे आम्हीच करतो. त्यामुळे माझ्याकडे या सर्व नेत्यांची कुंडली आहे. तुम्ही काळजी करू नका, असे प्रफुल पटेल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले होते.

नानांनी यावर मिश्‍कील भाषेत प्रत्युत्तर देत पटेल मोदी-शाहांची भाषा बोलताहेत, असे बोल सुनावले. नाना म्हणाले पटेल, मोदी आणि अमित शाहांसोबत बसणारे झाले आहेत. त्यामुळे त्यांचे गुण पटेलात येणारच. लोकांची कुंडली काढून त्यांना धमकावून, ब्लॅकमेल करून ईडी, सीबीआय लावून धमक्या देणाऱ्यांसोबत प्रफुल पटेल गेले आहेत. आता प्रफुल पटेल धमकी तर देणारच ना. मात्र, त्यांचे वक्तव्य लज्जास्पद असल्याचे नाना पटोले म्हणाले. पटेल-पटोले वादाच्या पहिल्या अंकाप्रमाणे दुसरा अंकही अधिक चर्चेत आला आहे.

Edited By : Atul Mehere

R

Nana Patole and Praful Patel
Nana Patole : अरेरे..! काल आंबेडकरांनी हाकलले, आज नानांनी दाखवला बाहेरचा रस्ता !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com