गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election ) रामदास तडस ( Ramdas Tadas ) यांना 53 टक्के मते मिळाली होती. 2014 आणि 2019 च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. आता त्सुनामी आहे. त्यामुळे आता 60 टक्के मते तडस यांना घ्यावी लागतील. मोदी यांचं नाव, रामदास तडस यांचं काम आणि 'अब की बार चार सौ पार', असा नारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
भाजपचे उमेदवार रामदास तडस ( Ramadas Tadas ) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे वर्ध्यात आले होते. "रामदास तडस तुम्ही लक्षात ठेवा, यंदा तिकीट मिळालं आहे. पण, पुढील वेळेस कुणी आपलं तिकीट पक्क समजू नका. कारण, 2029 च्या निवडणुकीत मोदी यांनी सांगितलंय की, 33 टक्के महिला खासदार आणि आमदारही महिला असतील. त्यामुळे आतापासून सवय करा," असं म्हणत फडणवीसांनी इच्छुकांना सूचक इशारा दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"तडस यांना सर्व डावपेच माहिती"
फडणवीस म्हणाले, "रामदास तडस हे पैलवान आहेत. तसेच, कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. एवढे दिवस कुस्तीगीर परिषद शरद पवारांच्या ताब्यात होती. आमच्या पैलवानानं असा डाव टाकला की, कुस्तीगीर परिषद हातात आली. तडस यांना सर्व डावपेच माहिती आहेत. चेहरा भोळा आहे, पण वेळप्रसंगी असा धोबीपछाड मारतात की समोरचा चितपट झाल्याशिवाय राहत नाही."
"आम्हाला 'पंजा' गायब करता आला नाही"
"जी गोष्ट आम्हाला जमली नाही, ती पवारांनी करून दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला. त्यानंतर जिल्हा परिषद, एक सोडून विधानसभेच्या सर्व जागा, नगर पालिका, नगर परिषद जिंकलो. पण, आम्हाला 'पंजा' गायब करता आला नाही. शरद पवार यांचे मनापासून आभार. कारण, त्यांनी वर्ध्यातून 'पंजा' गायब करून दाखवला. आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं."
"काँग्रेस वर्ध्यातून हद्दपार झाली"
"महात्मा गांधींचं नाव सांगून काँग्रेसनं इतकी वर्षे राजकारण केलं. त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवारांनी करून दाखवलं. काँग्रेस वर्ध्यातून हद्दपार झाली. पण, हद्दपारीनंतर उमेदवार सापडेना. उमेदवाराचा शोध सुरू झाल्यानंतर कुणी उभा राहण्यासाठी तयार नव्हतं. मग, एक उमेदवार राष्ट्रवादीनं काँग्रेसमधून आयात केला. तेही ( अमर काळे ) माझे मित्रच आहेत. त्यांना पक्क माहितेय की विधानसभेत त्यांचा टिकाव लागत नाही, तर लोकसभेत शहीद होऊन नाव आपलं मोठं करावं. या दृष्टीनं त्यांनी राष्ट्रवादीचं तिकीट घेतलं," असा टोलाही फडणवीसांनी काळेंना लगावला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.