Devendra Fadnavis News : "आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो," फडणवीस असं का म्हणाले?

Devendra Fadnavis In Vardha : भाजपचे उमेदवार रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे वर्ध्यात आले होते.
Sharad Pawar, Devendra Fadnavis
Sharad Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

आम्ही काँग्रेसमुक्त ( Congress ) वर्ध्याचा नारा दिला. पण, आम्हाला 'पंजा' गायब करता आला नाही. पण, शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी वर्ध्यातून 'पंजा' गायब करून दाखवला. आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो, अशी फटकेबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केली आहे.

भाजपचे उमेदवार रामदास तडस ( Ramadas Tadas ) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे वर्ध्यात आले होते. "वर्धा हा ना काँग्रेसचा, ना शरद पवारांचा, तो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांचा आहे," असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आम्हाला 'पंजा' गायब करता आला नाही"

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "जी गोष्ट आम्हाला जमली नाही, ती पवारांनी करून दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला. त्यानंतर जिल्हा परिषद, एक सोडून विधानसभेच्या सर्व जागा, नगरपालिका, नगर परिषद जिंकलो. पण, आम्हाला 'पंजा' गायब करता आला नाही. शरद पवार यांचे मनापासून आभार. कारण, त्यांनी वर्ध्यातून 'पंजा' गायब करून दाखवला. आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं."

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Devendra Fadnavis on Rahul Gandhi : राहुल गांधी जेथे-जेथे गेले, तेथे काँग्रेस फुटली !

"काँग्रेस वर्ध्यातून हद्दपार झाली"

"महात्मा गांधींचं नाव सांगून काँग्रेसनं इतकी वर्षे राजकारण केलं. त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवारांनी करून दाखवलं. काँग्रेस वर्ध्यातून हद्दपार झाली. पण, हद्दपारीनंतर उमेदवार सापडेना. उमेदवाराचा शोध सुरू झाल्यानंतर कुणी उभा राहण्यासाठी तयार नव्हतं. मग, एक उमेदवार राष्ट्रवादीनं काँग्रेसमधून आयात केला. तेही ( अमर काळे ) माझे मित्रच आहेत. त्यांना पक्क माहितेय की विधानसभेत त्यांचा टिकाव लागत नाही, तर लोकसभेत शहीद होऊन नाव आपलं मोठं करावं. या दृष्टीनं त्यांनी राष्ट्रवादीचं तिकीट घेतलं," असा टोलाही फडणवीसांनी काळेंना लगावला.

"वर्धा भाजपचं"

"गांधींजींचं वर्धा ना काँग्रेसचं ना शरद पवाराचं... ते पंतप्रधान मोदी यांचं होतं आणि भाजपचं आहे, यावर शिक्कामोर्तब झाला आहे," असंही फडणवीस म्हणाले.

R

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Devendra Fadnavis News : ‘आम्ही ऑपरेशन केले, तर तुम्हाला कळतच नाही’; दानवेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर फडणवीसांची गुगली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com