ranjitsingh naik nimbalkar dhairyasheel mohite patil sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : मोहिते-पाटील तुमच्याविरोधात माढ्यातून लोकसभा लढविणार; निंबाळकर म्हणाले, कुणीतरी...

Ranjitsingh Naik Nimbal Vs Ramraje Naik Nimbalkar : राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी सामील झाली आहे. पण, रामराजे निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्यातील वितुष्ट अद्याप कमी झालं नाही.

Akshay Sabale

2009 पासून माढा लोकसभा मतदारसंघ ( Madha Lok Sabha Election 2024 ) हा कायम चर्चेत असतो. आताही तो चर्चेत येण्याचं कारण म्हणजे मोहिते-पाटलांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjitsinh Naik Nimbalkar ) यांच्याविरोधात केलेलं बंड. धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel mohite patil ) यांनी भाजपचा राजीनामा दिला असून, ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे धैर्यशील मोहिते-पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अशी लढत माढ्यात पाहायला मिळणार आहे. तसेच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते रामराजे नाईक-निंबाळकर ( Ramraje Naik Nimbalkar ) हे सुद्धा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर नाराज आहेत.

त्या पार्श्वभूमीवर फलटणधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. या वेळी खासदार निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे ( Jaykumar Gore ) यांच्या तक्रारीचा पाढाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांसमोर वाचला. दुसरीकडे, रामराजे नाईक-निंबाळकर ( Ramraje Naik Nimbalkar ) माढ्यात विरोधात काम करत असतील, तर दौंडमधून आमदार राहुल कुल ( Rahul kool ) बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मदत करणार नाहीत, अशी आक्रमक भूमिका खासदार निंबाळकर ( Ranjitsinh Naik Nimbalkar ) यांनी घेतल्याचं बोललं जात होतं. यावर आता खासदार निंबाळकर यांनी भाष्य केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी नाईक-निंबाळकरांनी संवाद साधला.

रामराजे मदत करणार नसतील, तर सुनेत्रा पवारांना दौंडमधून मदत करणार नसल्याची ठोस भूमिका यांनी घेतलीय का? या प्रश्नावर खासदार निंबाळकर म्हणाले, "अशी कुठलीही चर्चा झाली नाही. निश्चितपणे राहुल कुल आणि आम्ही जवळील मित्र आहोत. माढ्यात राष्ट्रवादीनं मदत करावी, ही त्यांची प्रमुख भूमिका आहेत. त्यासंदर्भात राहुल कुल, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे विरोधातील कुठलीही भूमिका कुल यांनी घेतली नाही."

धैर्यशील मोहिते-पाटील माढ्यातून तुमच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढविणार आहेत, याबद्दल विचारल्यावर खासदार निंबाळकरांनी म्हटलं, "कुणीतरी विरोधात उभे राहत असतात. पण, ही पंतप्रधानपदासाठी निवडणूक आहे. फक्त माढ्यापूरती ही निवडणूक मर्यादित नाही. देशाचं धोरण, राजकारण प्रगतीला वेगळं ठरविणारी ही निवडणूक आहे. पंतप्रधान मोदींच्या धोरणाकडे पाहून समोरील उमेदवाराकडे दुर्लक्ष करू."

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT