Madha Loksabha : धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेशाच्या तयारीत, जयंत पाटील म्हणतात संपर्क झाला नाही...

Loksabha Election 2024 : धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करावा म्हणून त्यांचे कार्यकर्ते आग्रही होते. मोहिते पाटील गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात येत होता.
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite Patilsarkarnama
Published on
Updated on

Madha Political News : माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्या इच्छुक असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी (ता.11) धैर्यशील मोहिते पाटील पुण्यामध्ये शरद पवारांना भेटले. मात्र, त्यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्यावर थेट बोलणे टाळले.

धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यांनी भाजपमधील BJP आपल्या पदांचा राजीनामा दिल्याने ते सोमवारी (ता.15) शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धैर्यशील पाटील यांच्याशी आपला संपर्क झाला नसल्याचे सांगत 'गुगली' टाकली आहे.

'धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) शरद पवार गटात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. माझा एवढा संपर्क झालेला नाही. असं मी ऐकलंय की त्यांना हातात तुतारी घ्यायची इच्छा आहे', असे म्हणत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी थेट धैर्यशील मोहित पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार की नाही, यावर थेट बोलणे टाळले. मात्र, जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याच उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी शक्यता आहे.

Dhairyasheel Mohite Patil
Lok Sabha Election 2024 : धैर्यशील मोहिते-पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी, सोमवारी 'तुतारी' वाजवणार

धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करावा म्हणून त्यांचे कार्यकर्ते आग्रही होते. मोहिते पाटील गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात येत होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहिते पाटील यांची समजूत घालण्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन मोहिते पाटील यांच्या भेटीला गेले होते. मात्र, तेव्हादेखील कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी गिरीश महाजन यांची गाडी आडवत रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्याचा आग्रह केला होता. मात्र, या प्रकरणी तोडगा न निघाल्याने धैर्यशील मोहित पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला.

R

Dhairyasheel Mohite Patil
Lok Sabha election 2024 News : महाविकास आघाडीकडून 28 मराठा, तर 8 ओबीसी उमेदवार लोकसभेच्या रिंगणात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com