rakha khadse sharad pawar rohini khadse sarkarnama
विदर्भ

Rohini Khadse News : रोहिणी खडसे वहिनींच्या पराभवासाठी उतरल्या मैदानात; शरद पवारांसमोर दिला मोठा शब्द

Rohini Khadse On Sharad Pawar : "शरद पवार कन्येप्रमाणे सुप्रिया सुळे यांच्यावर प्रेम करतात. तसेच, कन्येप्रमाणे मला सांभाळावं," अशी भावनिक साद रोहिणी खडसेंनी घातली आहे.

Akshay Sabale

ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) पुन्हा स्वगृही अर्थात भाजपत प्रवेश करणार आहेत. पण, अद्यापही भाजप प्रवेशाचा मुहूर्त सापडला नाही. एकनाथ खडसे यांनी सून रक्षा खडसे ( Raksha Khadse ) यांना निवडून आणण्यासाठी प्रचार करत आहेत. दुसरीकडे मात्र मुलगी रोहिणी खडसे वहिनी रक्षा खडसे यांच्याविरोधात मैदानात उतरल्या आहेत. तसेच, मुक्ताईनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) उमेदवार श्रीराम पाटील यांना लीड देण्याचा शब्द रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांच्यासमोर दिला आहे. त्यामुळे रोहिणी खडसे यांनी वहिनीच्या पराभवाचा चंग बांधल्याचं बोललं जात आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातील ( Raves Lok Sabha Constituency ) राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेला शरद पवार, जयंत पाटील, रोहिणी खडसे आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोहिणी खडसे म्हणाल्या, "पक्षानं माझ्यावर विश्वास ठेवला, त्याला तडा जाऊ देणार नाही. राष्ट्रवादीचं काम निष्ठेनं करणार आहे. तसेच, मुक्ताईनगरमधून श्रीराम पाटील यांना लीड मिळवून देण्याचं काम कार्यकर्त्यांच्या मदतीनं करणार आहे. येथून श्रीराम पाटील यांना लीड कमी मिळालं, तर मी जबाबदार आहे. जर, लीड मिळालं, तर जनता जबाबदार आहे."

"मला राष्ट्रवादीची विचारधारा आवडत असल्यानं या पक्षात थांबणार आहे. आमच्या वाईट काळात शरद पवार यांनी दिलेली साथ आयुष्यभर विसरणार नाही. शरद पवार कन्येप्रमाणे सुप्रिया सुळे यांच्यावर प्रेम करतात. तसेच, शरद पवारांनी कन्येप्रमाणे मला सांभाळावं," अशी भावनिक साद रोहिणी खडसे यांनी घातली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT