Bacchu Kadu Vs Ravi Rana sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu On Ravi Rana : राणांनी काँग्रेसची 'बी-टीम' म्हणून डिवचलं, कडूंनी थेट 'स्वाभिमाना'वर ठेवलं बोट

Bacchu Kadu Vs Ravi Rana : नवनीत राणांना भाजपनं उमेदवारी दिल्यानंतर कडू विरुद्ध राणा एकमेकांवर टीका करत आहेत.

Akshay Sabale

भाजपकडून नवनीत राणा ( Navneet Rana ) यांनी गुरुवारी ( 5 एप्रिल ) उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे 'प्रहार'कडून दिनेश बूब यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अमरावतीत काँग्रेस-भाजप-प्रहार अशी तिरंगी लढत होणार आहे. यातच आमदार रवी राणा ( Ravi Rana ) यांनी बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांना काँग्रेसची 'बी-टीम', 'सेटलमेंट' करणारा म्हणत डिवचलं होतं. याला माजी मंत्री, 'प्रहार'चे नेते बच्चू कडू यांनी राणांनी 'स्वाभिमान' विकला म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

रवी राणा काय म्हणाले?

"खोटे बोलतात पण रेटून बोलतात, हे सगळ्या जनतेला कळते. नवनीत राणांना पाडायचे, हा एकच नारा आमच्या भाऊंचा ( बच्चू कडू ) आहे, तर निवडून कोणाला आणायचे आहे? ते काँग्रेसची बी-टीम झाले आहेत. पूर्ण महाराष्ट्रात सेटलमेंट करणारा म्हणून त्यांची ओळख आहे. एखादं सेटलमेंट आयुक्तांचं पद असेल, तर त्यांना द्यावं लागेल," अशी घणाघाती टीका रवी राणांनी ( Ravi Rana ) केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"नवनीत राणा चौथ्या क्रमांकावर राहतील"

यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू ( Bacchu Kadu ) म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी ते ( रवी राणा ) माफी मागत होते. आता तेच मला पैसे खाणारे म्हणतात. यातून जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे, हे आमच्याबरोबर असं वागतात, तर सामान्य लोकांसोबरत कसे वागत असतील. पराभवाच्या मानसिकतेतून राणा बोलत आहेत. आनंदराज आंबेडकर यांच्यापेक्षाही नवनीत राणांना कमी मते मिळतील. अमरावतीत नवनीत राणा चौथ्या क्रमाकांवर राहतील."

"राणांनी 'स्वाभिमान' पक्ष गुंडाळला"

"रवी राणा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते ना? त्यांचा 'स्वाभिमान' पक्ष राहिला नाही. आम्ही बी-टीम वगैरे काही नाही. नवनीत राणा भाजपत, तर राणांचा 'स्वाभिमान' पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला बी-टीम बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. राणांनी 'स्वाभिमान' विकला आहे. राणांनी 'स्वाभिमान' पक्ष गुंडाळला असला, तरी लोकांच्या मनात 'स्वाभिमान' शिल्लक आहे," असं बच्चू कडूंनी म्हटलं.

"विधानसभेसाठी राणांनी सेटलमेंट करून ठेवलं"

"राणांनी दहा ठिकाणी सेटलमेंट केले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीबरोबर सेटलमेंट केली. विधानसभेसाठी सेटलमेंट करून ठेवलं आहे. तुमची काळी कामे काढायला लावू नका. काढायला लागलो, तर वांदे होतील," असा इशारा बच्चू कडूंनी राणांना दिला आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT