भाजपनं नवनीत राणा ( Navneet Rana ) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अमरावतीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता मेळघाटात केलेल्या साडीवाटपावरून प्रहारचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती. याला अपक्ष आमदार रवी राणा ( Ravi Rana ) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "काही लोक फक्त नौटंकी करण्यासाठी राजकारणात आले आहेत," असं टीकास्त्र राणांनी कडूंवर सोडलं आहे.
बच्चू कडू काय म्हणाले?
"पैसा आईची सेवा करू शकत नाही. सेवा करण्यासाठी चांगलं मन लागतं. सतरा रुपयांची साडी देऊन मेळघाटातील महिलांचा अपमान केला. दोन कोटींच्या गाडीत फिरायचं आणि सतरा रुपयांची साडी वाटून लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाकावी लागेल," असं कडूंनी ( Bacchu Kadu ) म्हटलं होतं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग केला"
यावर प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देताना रवी राणा ( Ravi Rana ) म्हणाले, "शेतकऱ्यांसाठी मी चार ते पाच वेळा तुरुंगात गेलो आहे. अन्नत्याग केला आहे. कोणतंही सरकार असूद्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढलो आहे. पण, काही लोक फक्त नौटंकी करण्यासाठी राजकारणात आले आहेत. बोलणं फार सोपं आहे. ते आता आंतरराष्ट्रीय नेते झाले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवक्ते झाल्यामुळे ते फार बोलू शकतात."
"वेळ आल्यावर बच्चू कडूंना योग्य उत्तर देणार"
"डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती होते. त्यांच्या जागी बच्चू कडूंना बसवलं पाहिजे. ते अमेरिकेतून देशावर लक्ष ठेवतील आणि देशाचं भलं होईल. वेळ आल्यावर बच्चू कडूंना योग्य उत्तर देणार. मी किराणा वाटतो, त्यावरही टीका होते. स्वत: खिशात कधी हात टाकून बघा," असं राणांनी कडूंना सुनावलं आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.