Bacchu Kadu News : "दोन कोटींच्या गाडीत फिरायचं अन् सतरा रुपयांची साडी वाटायची," कडूंचा राणांवर 'प्रहार'

Bacchu Kadu Vs Navneet Rana : भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बच्चू कडूंनी नीलेश बूब यांना 'प्रहार'कडून मैदानात उतरवलं आहे.
Navneet Rana Bacchu Kadu
Navneet Rana Bacchu Kadusarkarnama
Published on
Updated on

अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा ( Navneet Rana ) आणि माजी मंत्री, बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांच्यातील विस्तव जाण्याचं नाव घेत नाही. नवनीत राणांच्या उमेदवारीला बच्चू कडू आणि महायुतीतील उमेदवारांनी विरोध केला होता. पण, कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील श्रेष्ठींनी विश्वास दाखवत राणांना उमेदवारी दिली. त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनीसुद्धा अमरावतीत उमेदवार जाहीर केला आहे. यानंतर कडूंकडून राणांवर 'प्रहार' करणेच सुरूच आहे.

एका सभेत बोलताना कडूंनी ( Bacchu Kadu ) साडीवाटपावरून नवनीत राणांवर ( Navneet Rana ) टीका केली आहे. "सतरा रुपयांची वाटलेली साडी निवडणुकीत मतपरिवर्तन करू शकत नाही. लोकांना गुलामीकडे नेणारी व्यवस्था तोडून टाकावी लागेल," असा हल्लाबोल कडूंनी राणांवर केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मेळघाटातील महिलांचा अपमान केला"

बच्चू कडू म्हणाले, "पैसा आईची सेवा करू शकत नाही. सेवा करण्यासाठी चांगलं मन लागतं. सतरा रुपयांची साडी देऊन मेळघाटातील महिलांचा अपमान केला. दोन कोटींच्या गाडीत फिरायचं आणि सतरा रुपयांची साडी वाटून लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाकावी लागेल."

Navneet Rana Bacchu Kadu
Chandrashekhar Bawankule News : "बच्चू कडूंनी नाही ऐकलं, तर...", बावनकुळेंनी थेटच सांगितलं

"इमानदारीकडे जाण्याचं काम आम्ही केलं"

"माझं आणि राजकुमार बडोले यांचं सगळं सुखात चालू होतं. फक्त तटस्थ राहण्यासाठी निरोप आला होता. पण, इमानदारीकडे जाण्याचं काम आम्ही केलं आहे. कारण, सतरा रुपयांची साडी वाटून निवडणुकीत मतपरिवर्तन होणार नाही," असं कडूंनी म्हटलं.

"गाडगेबाबांनी महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवला"

"महाराष्ट्रावर आलेली अनेक आव्हान छत्रपती शिवाजी महाराज यांनी उटलून लावली आहेत. अमरावती हा संत गाडगेबाबा यांचा जिल्हा. गाडगेबाबांच्या घरात अन्नाचा कण नव्हता. पण, अमरावतीतील गाडगेबाबांनी महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवला," असंही कडू म्हणाले.

R

Navneet Rana Bacchu Kadu
Bacchu Kadu On Rana : "आम्ही रवी आणि नवनीत राणांना खूप घाबरतो, त्यामुळे...", बच्चू कडूंची खोचक प्रतिक्रिया

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com