Prataprao Jadhav, Vijayraj Shinde sarkarnama
विदर्भ

Loksabha Election 2024 : बुलढाण्यात भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर; महायुतीच्या उमेदवाराला फटका बसणार..!

सरकारनामा ब्यूरों

Buldhana News : बुलढाणा लोकसभेसाठी महायुतीतून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांची उमेदवारी घोषित होऊन त्यांनी अर्जही दाखल केला आहे, तर दुसरीकडे भाजपमध्ये नाराजी असल्याचे कारण देत माजी आमदार विजयराज शिंदे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बुलढाण्यात भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर असली असून, याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी घोषित होऊन त्यांनी अर्जदेखील भरला आहे, तर दुसरीकडे भाजपमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे कारण देत भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख, माजी आमदार विजयराज शिंदे यांनीसुद्धा याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यामुळे महायुतीत बंडखोरी दिसून आली होती. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी विजयराज शिंदे यांना उद्देशून त्याला त्याची औकात दिसून येईल, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर आज विजयराज शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मी अर्ज मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच गुलाबराव पाटलांना त्यांची औकात त्यांना दोन वेळे पराभूत करून त्यांच्या मतदारसंघातील लोकांनी दाखवून दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या निवडणुकीतसुद्धा त्यांची औकात दिसून येईल, असे वक्तव्य केले आहे, तर दुसरीकडे भाजप प्रवक्ता विनोद वाघ यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची शिस्त पाहता विजयराज शिंदे हे उमेदवारीचा अर्ज मागे घेतील, असे स्पष्ट केले होते. मात्र, या गोंधळात जिल्ह्यातील भाजपत शीतयुद्ध सुरू झाल्याचे स्पष्ट झाले असून, महायुतीत बिघाडी दिसून आली आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला नक्की फटका बसणार असल्याचे चित्र आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT