Amravati News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. याबाबतचा एक बॅनर शिवसैनिकाने व्हायरल केला असून, त्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे नवनीत राणा यांचे टेन्शन वाढणार आहे. तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आनंदराव अडसूळ यांना निवडून आणणारच, असा ठाम निर्णयच शिवसैनिकांनी केल्याचा दिसत आहे.
नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. राज्यातील महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. ज्या जागांबाबत वाद सुरू आहेत, अशा जागांची घोषणा अद्याप झालेली नाही, तर नवनीत राणा यांनी आता आमच्या युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा आणि आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस जो आदेश देतील तो आम्ही पाळणार असल्याचा दावा केला आहे. तर आपण कालही एनडीएत होतो, उद्याही एनडीएतच असणार त्यामुळे आगामी काळात एनडीएकडून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तशी त्यांनी तयारीही सुरू केली आहे. यातच शिवसैनिकांनी व्हायरल केलेल्या एका बॅनरमुळे चर्चेला ऊत आला आहे, तर अमरावतीत इच्छुक असलेल्या नवनीत राणा (Navnit Rana) यांचं टेन्शन वाढणार आहे, तर महायुतीलाही या जागेचा तिढा सोडविताना कसरत करावी लागणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आनंदराव अडसूळ यांना निवडून आणणारच', अशा आशयाचे बॅनर सध्या अमरावतीत समाजमाध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहेत. या बॅनरवरती शिवसेना (Shivsena) नेते आनंदराव अडसूळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह धनुष्यबाणाचा फोटो आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघावर आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी दावा सांगितला असून, निवडणूक लढविण्यावर ते ठाम असल्याचे या व्हायरल बॅनरवरून दिसून येते. तर तेथील शिवसैनिकांनीही तशी तयारी केल्याचे दिसत आहे. आता जर नवनीत राणा महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढविणार असतील, तर शिंदे गटापुढे अडसूळ यांच्या दाव्याने पेच निर्माण झाला आहे, हे नक्की.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.