Anandrao Adsul : माजी खासदार आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ; अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

Anandrao Adsul News : मरीन लाइन्स पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल
Anandrao Adsul
Anandrao Adsulsarkarnama
Published on
Updated on

Anandrao Adsul News : माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मरीन लाइन्स पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.२०) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मेहबूबखान पठाण यांच्यावर मंत्रालयाच्या परिसरात आकाशवाणी आमदार निवास येथे मंगळवारी रात्री अडसूळ आणि त्यांच्या ३ साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप संबधित तक्रारीत करण्यात आला आहे.

दी महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत पठाण यांच्या नेतृत्वाखालील एकता पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले. मात्र अडसूळ आणि त्यांच्या साथीदारांनी या सोसायटीत आमची युनियन असून सभासदांची वर्गणी पतपेढीमार्फत भरा, तसेच दोघा कर्मचाऱ्यांची संचालक मंडळावर नियुक्ती करा, अशी मागणी केली.

Anandrao Adsul
Pune News : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश; पुढील दोन महिन्यात...

तसेच मंगळवारी पतसंस्थेत येऊन वाद घालण्यास सुरुवात केल्याचा आरोप पठाण यांच्याकडून करण्यात आला आहे. युनियनची वर्गणी पतसंस्थेने भरणे नियमाबाह्य आहे ते करता येणार नाही. तसेच दोन कर्मचाऱ्यांची संचालक मंडळावर नियुक्ती करण्याबाबत आगामी बैठकीत निर्णय घेऊ, असे पठाण यांनी अडसूळ यांना सांगितले. मात्र असे सांगूनही त्यांनी मारहाण केल्याचे पठाण यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Anandrao Adsul
Shamburaj Desai : कर्नाटकच्या नाड्या शंभूराज देसाई आवळणार!

दरम्यान, महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांना मारहाणीचा प्रयत्न, तसेच वरिष्ठ लिपिक मोरे यांनाही धमकावण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com