Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis News: उद्धव ठाकरेंची टीका भाजपच्या जिव्हारी, फडणवीसांचंही जशास तसं प्रत्युत्तर ; म्हणाले...

Loksabha Election 2024 : 'तुम्ही नुसते टोमणे मारत बसा. टोमणे मारल्यामुळे तुम्हाला मतं तर मिळणार नाहीत. मात्र...'

Deepak Kulkarni

Devendra Fadnavis News: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पालघरमध्ये पक्षाची प्रचार सभा घेतली. ठाकरे गटाचे उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी पालघर येथील बोईसर या ठिकाणी जाहीर सभा घेतली.या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह शिंदे गटावर सडकून टीका केली.यासभेत त्यांनी मोदी- शाहांनी दहा वर्षांत काय केला ते सांगावं, मी अडीच वर्षांत काय केलं ते सांगतो, असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. त्याच टीकेवर आता उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले,उद्धव ठाकरे तुम्ही आमच्याशी विकासावर चर्चा करू नका.जर आम्ही नुसतं नितीन गडकरींनी केलेल्या विकासकामांची यादी सांगितली. तरी तुम्हाला चार-पाच पेले कोमट पाणी प्यायची वेळ येईल. त्यामुळे तुम्ही नुसते टोमणे मारत बसा. टोमणे मारल्यामुळे तुम्हाला मतं तर मिळणार नाहीत. मात्र तुमच्या मनाचं समाधान नक्कीच होईल असा चिमटाही फडणवीसांनी यावेळी ठाकरेंना काढला.

फडणवीस म्हणाले, मी उद्धव ठाकरेंचे भाषण मोबाईलवर ऐकले.त्यात त्यांनी अडीच वर्षांत आम्ही काय काम केलं,ते ऐकायचे असेल तर एका मंचावर या.अरे उद्धवजी अडीच वर्ष तुम्ही नुसतं फेसबुक लाईव्ह करत होते आणि कोमट पाणी प्या असे म्हणत होते.उपराजधानी नागपूरला सुद्धा तुम्ही आले नाहीत असा खोचक टोलाही त्यांनी ठाकरेंनी लगावला.

नांदेड येथील सभेत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत डिवचले होते. यालाच प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) घणाघाती वार केला आहे. "महाराष्ट्रात येऊन तुम्ही ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला, त्या शिवसेनेला नकली म्हणता? नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे की काय? असा सवाल ठाकरेंनी विचारला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ती काय तुमची डिग्री आहे की काय?

महाराष्ट्रात येऊन तुम्ही ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला, त्या शिवसेनेला नकली म्हणता? नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे की काय? असा घणाघातही ठाकरे यांनी केला. भाजप हा भेकड पक्ष आहे.ज्या पद्धतीने त्यांनी आपली शिवसेना (Shiv Sena) फोडली. तपास यंत्रणांची बंदूक डोक्यावर लावली.ते गद्दार इथून पालघरमधून ते गुजरातला गेले होते,आता मी बघतो आता कोण गद्दार जाईल तेच बघायला आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT