Palghar News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पालघरमध्ये पक्षाची प्रचार सभा घेतली. ठाकरे गटाचे उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी पालघर येथील बोईसर या ठिकाणी जाहीर सभा घेतली. या वेळी त्यांनी भाजपवर बरसून टीका करतानाच, मोदी आणि शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. आम्हाला नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची 'डिग्री' आहे का? असा थेट सवाल त्यांनी पंतप्रधान मोंदींना केला आहे. (Lok Sabha Election 2024)
ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला वचन देतो, भारतीताई कामाडी तुमच्या आशीर्वादाने लोकसभेत जाणार आहेत. त्यानंतर सर्वात आधी वाढवण बंदराचा फडशा पाडणार आहे. वाढवण बंदर झालं तर ते कुणाच्या घशात जाईल? विकास कुणाचा होणार? माझ्या मच्छीमार लोकांचं काय होणार? म्हणून आता वेळ आलेली आहे. यांना आताच गाडायचं. गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रात फिरत आहेत, या महाराष्ट्र द्रोह्यांना आता पराभूत कराच, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"महाराष्ट्रात येऊन तुम्ही ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला, त्या शिवसेनेला नकली म्हणता? नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे की काय? असा घणाघातही ठाकरे यांनी केला. "भाजप हा भेकड पक्ष आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आपली शिवसेना (Shiv Sena) फोडली. तपास यंत्रणांची बंदूक डोक्यावर लावली. ते गद्दार इथून पालघरमधून ते गुजरातला गेले होते, आता मी बघतो आता कोण गद्दार जाईल तेच बघायला आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नांदेड येथील सभेत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेवर टिका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला नकली शिवसेना म्हणत अमित शाह यांनी डिवचले होते. यालाच प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हा घणाघाती वार केला आहे. "महाराष्ट्रात येऊन तुम्ही ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला, त्या शिवसेनेला नकली म्हणता? नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे की काय? असा सवाल ठाकरेंनी विचारला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.