Nana Patole  sarkarnama
विदर्भ

Nana Patole News : नाना पटोले थोडक्यात बचावले, घातपाताचा प्रयत्न?

Loksabha Election : मंगळवारी रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपुर येथील प्रचारसभा संपवून नाना पटोले हे त्यांच्या राहत्या गावी सुकळी येथे कारने जात होते. मात्र, भिलेवाडा जवळ त्यांच्या कारला मागून ट्रकने धडक दिली.

Roshan More

Loksabha Election : भंडारा जिल्ह्यातील प्रचारसभा संपवून परतीचा प्रवास करणाऱ्या काँग्रेसचे Congress प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषणा अपघात झाला. एका ट्रकने नाना पटोले प्रवास करणाऱ्या कारला धडक दिली. अपघात कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने गाडीतून प्रवास करणाऱ्या नाना पटोलेंना दुखापत झाली नाही. मात्र, हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न? असे सूचक ट्विट नाना पटोलेंनी केले आहे.

मंगळवारी रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपुर येथील प्रचारसभा संपवून नाना पटोले (Nana Patole) हे त्यांच्या राहत्या गावी सुकळी येथे कारने जात होते. मात्र, भिलेवाडा जवळ त्यांच्या कारला मागून ट्रकने धडक दिली. या अपघात कारचे प्रचंड नुकसान झाले. अपघातातून नाना पटोले थोडक्यात बचावले. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अपघातानंतर नाना पटोले यांनी ट्विट करत ते सुखरुप असल्याची माहिती दिली. तसेच हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न? पोलीस याची चौकशी करतील. आपल्या सर्वांच्या सदिच्छा, प्रेम व परमेश्वराच्या कृपेने मी सुखरूप आहे. काळजी नसावी, असे ट्विट करत हा घातपात असण्याची भीती व्यक्त केली. काँग्रेसच्या इतर नेत्यांनी देखील हा घातपात असल्याची भीती व्यक्त केली.

काँग्रेस नेते अतुल लोंढे (Atul Londe) यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ? असा सवाल केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे, असे ट्विटही अतुल लोंढे यांनी केले आहे. या प्रकरणी नाना पटोले यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT