Yavatmal Polling Booth  sarkarnama
विदर्भ

Loksabha Election : भोजन सुरू, मतदान केंद्र 25 मिनिटं बंद ; यवतमाळमधला धक्कादायक प्रकार

Roshan More

Loksabha Election : मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असते. पहिल्या टप्प्यात विदर्भात कमी मतदान झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच दुसऱ्या टप्प्यातदेखील सकाळच्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढली नसताना राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असताना यवतमाळमधील हिवरी मतदान केंद्र हे जेवणासाठी सुमारे 25 मिनिटे बंद करण्यात आले होतं. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना बाहेर ताटकळत थांबावे लागले.

हिवरी मतदार केंद्रात दुपारी दोनच्या नंतर तब्बल 25 मिनिटे मतदान केंद्र Polling Booth बंद ठेवण्यात आले. मतदानाच्या वेळी भोजनासाठी हे मतदान केंद्र बंद ठेवल्याने मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या कृतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. कर्मचाऱ्यांचे भोजन झाल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मतदान बंद ठेऊन भोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मतदान विनाअडथळा पार पडावे, यासाठी कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था मतदान केंद्रावर केली जाते. मात्र, त्यांना मतदान केंद्र बंद ठेवून भोजन करता येत नसल्याचे सांगितले जात आहे.

मतदान केंद्र बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला यांना नाहक त्रास सहन करावा लागला. मतदानासाठी आलेल्या मतदारांनादेखील मतदान केंद्र असे बंद ठेवण्यात येत नसल्याचे माहिती नव्हती. त्यामुळे तेदेखील कर्मचाऱ्यांच्या भोजन संपून कधी परत मतदान सुरू होते याची वाट पाहत होते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT