Pune News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत पाहायला मिळत आहे. राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार जोर धरत आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातील लढत नणंद विरुद्ध भावजयी अशी होणार आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताकद लावली आहे.
बारामतीमधून महायुतीने उमेदवारी दिलेल्या सुनेत्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीर सभा, कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. या प्रत्येक मेळाव्यात मोदींचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या विचारांचा खासदार विजयी करा, असे आवाहन अजित पवार (Ajit Pawar) करत आहेत, तर अनेक कार्यक्रमात 'माझ्या बायकोला निवडून द्या, सगळी कामं करतो, असे वक्तव्य जाहीरपणे अजित पवार सतत करताना दिसत आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, 'कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल'. मी नात्यांसाठी राजकारणात आले नाही तर मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आहे. मी पहिला देश मग राज्य मग पक्ष त्यानंतर नाती, असे मानते. दादा असे बोलतात याचं मला मोठं आश्चर्य वाटते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कणखर नेता आणि विरोधी पक्षनेता म्हणून अजित पवारांकडे पाहत होते. आता जे अजित पवार दिसत आहेत. ते अजित पवार नाहीत. त्यांचे आत्ताचे भाषण ऐकले की, आश्चर्य वाटते. एकेकाळी कडक भाषण करणारे हेच ते अजितदादा आहेत, यावर विश्वासच बसत नाही, अशी टीका सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. खासदार सुळे या शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होत्या. खडकवासला मतदारसंघात येण्याऱ्या परिसरात त्या प्रचार करत आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
पवारसाहेबांना संपवण्यासाठी जोरदार षडयंत्र सुरू आहे. महायुतीमधील सर्व नेत्यांना मिळून पवारसाहेबांना संपवायचे आहे. चंद्रकांत पाटील बारामतीत आले होते. त्यावेळी त्यांनी हे बोलून दाखवलं होतं. त्यांना पवारसाहेबांना त्रास द्यायचा आहे. शरद पवारांना संपवायचं आहे. हाच अजेंडा घेऊन विरोधक कामाला लागले आहेत, असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर केला आहे.
पुण्यासह संपूर्ण राज्यात (Maharashtra) सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असूनही कामे झाली नाहीत, हे त्यांचं अपयश आहे. पुणे पालिकेच्या निष्क्रीयतेमुळे पुण्यातील पाणी, कचरा, रस्त्यावरीव वाहतुकीची कोंडी हे प्रश्न सुटलेले नाहीत. पाण्याची परिस्थिती राज्यातील सगळेच नागरिक भोगत आहेत. मतदारसंघात दौरे काढत असल्याने नागरिकांचे प्रश्न नक्की काय आहेत, याची संपूर्ण माहिती आपल्याला असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.