Vijay Wadettiwar,Dharmaraobaba Atram sarkarnama
विदर्भ

Loksaha Election 2024 : विजय वडेट्टीवार यांचे धर्मराव बाबांना आव्हान; मंत्रीपद जाण्याच्या भीतीने त्यांच्याकडून आरोप...

Vijay Wadettiwar विजय वडेट्टीवार म्हणाले, गडचिरोलीत मी तळ ठोकून असून म्हणून मला त्रास देण्यासाठी मंत्री आत्राम यांच्याकडून आरोप केले जात आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Gadchiroli Loksabha News : गडचिरोली मतदारसंघ हा काँग्रेसमय झाला असून या मतदारसंघात भाजपचा पराभव दिसत आहे. भाजपचा पराभव झाला तर धर्मराव बाबा यांचे मंत्रीपद जाईल, म्हणून ते माझ्यावर आरोप करत आहेत, अशी टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, गडचिरोलीत मी तळ ठोकून असून म्हणून मला त्रास देण्यासाठी मंत्री आत्राम यांच्याकडून आरोप केले जात आहेत. धर्मराव आत्राम यांना माझे आव्हान आहे, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात भाजपला लीड मिळवून द्यावे. यांच्यापुढे चर्चा झाली तर आत्राम यांची नार्को टेस्ट करा, असेही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

तुम्हाला उद्या उमेदवारी मिळणार का माहित नाही, लोकसभेत तुमची गोची केली. तिथे जाऊन गुलाम होऊन जगत आहेत. दुसऱ्याला बदनाम करु नका. स्वतः बेईमानी करायची, पक्ष फोडायचे, पाप करायचे त्यावर पांघरूण घालण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करायचे, हे बिनबुडाचे आरोप आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गडचिरोली आम्ही जिंकत आहोत, सर्व सूत्र हातात घेतली आहेत. पराभव समोर दिसत आहे, म्हणून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. हे नावाला राजे आहेत. त्यामुळे हे भाजपसमोर झुकले आणि यांची इच्छा असेल इतरांनी झुकावे, पण आम्ही स्वाभिमानी आहोत. काँग्रेसला जिंकून देऊच. चार जूनला त्यांना कळेल गडचिरोलीमध्ये काँग्रेसच राजा आहे. त्यांची जागा त्यांना दिसेल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT