Mahadevrao Shivanakar Death Sarkarnama
विदर्भ

Mahadevrao Shivanakar death : भाजपने विदर्भातील मोठा नेता गमावला, सिंचन मंडळांची स्थापना करणाऱ्या माजी मंत्र्याचे निधन

Mahadevrao Shivanakar’s Political Journey : भाजपचे नेते आणि राज्याचे माजी अर्थ आणि सिंचनमंत्री प्राध्यापक महादेवराव शिवणकर यांचे सोमवारी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. राज्यात सर्वत्र काँग्रेसचे प्राबल्य असताना शिवणकर यांनी गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यात भाजपला मोठा लोकाश्रय मिळवून दिला होता.

Rajesh Charpe

Nagpur News, 20 Oct : भाजपचे नेते आणि राज्याचे माजी अर्थ आणि सिंचनमंत्री प्राध्यापक महादेवराव शिवणकर यांचे सोमवारी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. राज्यात सर्वत्र काँग्रेसचे प्राबल्य असताना शिवणकर यांनी गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यात भाजपला मोठा लोकाश्रय मिळवून दिला होता.

त्यांच्या निधनामुळे भाजपने एक लोकनेता गमावला आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांच्याच कार्यकाळात विदर्भासह राज्यभरात विभागनिहाय सिंचन मंडळाची स्थापना करण्यात आली होती. संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला होता.

शिवणकर सुरुवातीला प्राध्यापक होते. माजी आमदार लक्ष्मणराव मानकर यांच्या कॉलेजमध्ये ते शिकवत होते. मानकर यांचे उत्तराधिकारी म्हणून शिवणकर यांना भाजपने उमेदवारी दिली होती. 1978, 80 आणि 86 असे सलग तीन वेळा ते गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदारसंघातून आले होते. 1990 च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा 95 मध्ये विधानसभेत पुनरागमन केले.

त्यावेळी शिवसेना आणि भाजपचे सरकार राज्यात स्थापन झाले. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना मानाचे स्थान दिले. पहिली अडीच वर्ष ते राज्याचे अर्थमंत्री होते. सिंचनाच्या अनुशेषामुळे त्यावेळी विदर्भात मोठा असंतोष निर्माण झाला होता. तो दूर करण्यासाठी शिवणकर यांच्याकडे सिंचन खाते सोपवण्यात आले होते. यावेळी सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी सिंचन महामंडळांची स्थापना करण्यात आले होते.

विदर्भ सिंचन मंडळाच्या माध्यमातून विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यास मोठी मदत झाली होती. तसेच उर्वरित महाराष्ट्रातही सिंचनाची सुविधा झाली. 1999 मध्ये ते पुन्हा निवडून आले. मात्र राज्यात काँग्रेसची सत्ता आली. हीच त्यांची शेवटची टर्म ठरली. 2004 च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर शिवणकर यांना पुन्हा सक्रिय राजकारणात परतता आले नाही.

महाजन आणि मुंडे असताना शिवणकर यांना भाजपात मानाचे स्थान होते. त्यावेळी विदर्भातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. मात्र नंतरच्या पिढीसोबत शिवणकर यांचे फारसे सुर जुळले नाही. त्यांचा मुलगा विजय शिवणकर हे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष झाले. मात्र भाजपच नेतृत्व संधी देत नसल्याने त्यांनी प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र येथेही त्यांना फारशी संधी मिळाली नाही. ते पुन्हा भाजपात सक्रिय झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT