Navneet Rana Sarkarnama
विदर्भ

Navneet Rana: CM शिंदेंनी महायुतीच्या धर्म पाळण्यासाठी दम भरला; राणा म्हणाल्या, 'मी वादळला...'

Navneet Rana Responds Strongly to CM Eknath Shinde Reminder of Mahayuti Alliance: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या धर्माची आठवण करून देताच, माजी खासदार नवनीत राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

Pradeep Pendhare

Amravati News : भाजप नेत्या नवनीत राणा आक्रमक नेत्यांपैकी एक आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या तिकिटावर निवडणुकीला समोरे जाताना त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून राणा दाम्पत्य काहीसे नाराज आहे.

महायुतीविरोधात हे दाम्पत्य काहीसे आक्रमक झाल्याचे दिसते. महायुतीमधील शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनीत राणा यांना महायुतीच्या धर्माची आठवण करून देताच, राणा यांनी त्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले. राणा यांच्या या उत्तरामुळे महायुतीची कोंडी झाली आहे.

विधानसभा निवडणुकीला भाजप (BJP) नेत्या नवनीत राणा यांनी महायुतीच्या विरोधात प्रचारात उतरल्यात. दर्यापूरमधील महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्याविरोधात उभे असलेले भाजपचे बंडखोरी करणारे रमेश बुंदीले यांच्या प्रचाराला नवनीत राणा सहभागी झाल्या. नवनीत राणा नुसत्या सहभागी झाल्या नाहीतर सभेत जोरदार भाषण केले. भाजपेचे बंडखोर माजी आमदार रमेश बुंदीले युवा स्वाभिमान पक्षाकडून उमेदवारी करत आहेत.

शिंदेच्या इशाऱ्यांनतर दोन सभा

रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी दर्यापूर मतदार संघात प्रचार सभा घेतल्या. यावर महायुतीमधील शिवसेना (Shivsena) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक झालेत. दर्यापूरमध्ये सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळावा, असा दम राणा दाम्पत्यांना भरला. शिंदे यांच्या या जाहीर दमबाजीनंतर देखील नवनीत राणा यांनी रमेश बुंदीले यांच्यासाठी दोन ठिकाणी सभा घेतल्या.

सर्वांनी मिळून पाडले

नवनीत राणा म्हणाल्या, "मी कुठल्याच वादळाला घाबरत नाही. मी हा मतदारसंघ दत्तक घेतला असून युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या पाठीशी गंभीरपणे उभी आहे". या सर्वांनी मिळून माझा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. यानंतरही मी अजिबात खचले नाही, आणि खचणार देखील नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला.

ठाकरे, शिंदेंच्या उमेदवारांवर टीका

दर्यापूरच्या सभेत नवनीत राणा यांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर जोरदार टीका केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गजानन लवटे, तर शिवसेना पक्षाचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. एक बँक लूटणारा आणि दुसरा दारू विकणारा आहे, अशा हल्ला नवनीत राणा यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT