Savner Assembly Constituency : अमोल देशमुखांनी दाखल केली केदारांसह सख्या भावावर ‘चार्जशिट'

Amol Deshmukh files chargesheet against Kedar and His Brother: सावनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अमोल देशमुख यांनी आपले सख्खे भाऊ व भाजपचे उमेदवार आशिष देशमुख आणि काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर चार्जशीट दाखल केली.
Sunil Kedar, Ashish Deshmukh
Sunil Kedar, Ashish DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : सावनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अमोल देशमुख यांनी आपले सख्खे भाऊ व भाजपचे उमेदवार आशिष देशमुख आणि काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर चार्जशीट दाखल केली. दोघेही स्वतःच्या सोयीचे, पैशाचे राजकारण करतात. मतदारांना वेठीस धरतात. दोघांनाही फक्त सत्ता आणि पॉवर हवी आहे. मतदारसंघाचा विकास आणि जनतेशी त्यांचे काही देणेघेणे नसल्याचा आरोप त्यांचा आहे.

सावनेर विधानसभा मतदारसंघातून अमोल देशमुख यांनी उमेदवारी मागितली होती. या मतदारसंघातून एकाही इच्छुकाने मुलाखत दिली नव्हती. सुनील केदारांच्या (Sunil Kedar) भीतीमुळे मुलाखती घेण्यात आल्या नाहीत. घोटाळ्यात ते आढळल्याने निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला उमेदवार केले. त्या डमी उमेदवार आहेत. त्यांना समोर करून केदारांनाच आपल्या हातात सत्ता ठेवायची आहे. त्यांनी काँग्रेस (Congress) पक्षाचे खासगीकरण केले आहे. त्यांच्या डोक्यात चोवीस तास राजकारण शिजत असते. दुसरा काहीच उद्योग त्यांना नाही.

Sunil Kedar, Ashish Deshmukh
Pune Assembly Election : हातगाडीवाले आणि स्टॉलधारकांच्या समस्यांचा पाठपुरावा करू - रवींद्र धंगेकर

इतके वर्षे आमदार राहून सावनेरमध्ये एक उद्योग आणाला नाही, रोजगार उपलब्ध करून दिला नाही की सिंचना सुविधा. सहकारमहर्षी बाबासाहेब केदार यांचे पुत्र म्हणून ते मिरवतात. मात्र एकही सहकारातून एकही कारखाना व सहकारी बँक त्यांनी उभी केली नाही. उलट नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला घोटाळा करून त्यांनी बुडवले असल्याचा आरोपही अमोल देशमुख यांनी केला.

Sunil Kedar, Ashish Deshmukh
Ravindra Dhangekar : भारतीय जनता पक्षाचा आमदार असूनही कसब्यात सुमारे ३० वर्षांचा विकासाचा अनुशेष : रवींद्र धंगेकर

आशिष देशमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र व माझे सख्खे भाऊ आहेत. मात्र, त्यांना कुठलीच विचारधारा व निष्ठा नाही. नातेवाईकांसोबतही त्यांना काही देणे घेणे नाही. आधी काका अनिल देशमुख यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढली. त्यानंतर पुन्हा चुलत भावाच्या विरोधात ते उभे राहणार होते. सावनेर मतदारसंघ ते सोडून गेले होते. आता निवडणुकीत ते पुन्हा आले आहेत.

Sunil Kedar, Ashish Deshmukh
Sachin Pilot : 'पढेंगे तो बढेंगे' सचिन पायलट यांचे भाजपला प्रत्युत्तर

काँग्रेसमधून भाजपमध्ये आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये असे त्यांचे सुरू असते. आपल्या नेत्यांवर टीका करणे आणि चर्चेत राहणे हेच त्यांना आवडते. फक्त वैयक्तिक लाभासाठी त्यांना निवडणूक लढायची आहे. म्हणूनच आपण सावनेर मतदारसंघातून निवडणूक लढत आहोत. दोन्ही नेत्यांना येथील जनता कंटाळली असल्याचा दावा अमोल देशमुख यांनी केला.

Sunil Kedar, Ashish Deshmukh
Sharad Pawar Politics: शरद पवारांच्या सभेने छगन भुजबळ मतदारसंघात झाले सक्रीय...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com