Gondia Assembly Constituency: जाना था जापान, पहुँच गए चीन...समझ गए ना! किशोर कुमार यांचं हे गाण खूप प्रसिद्ध आहे. या गाण्याच्या बोलानुसार असाच एक किस्सा काँग्रेस नेते खासदार सचिन पायलट यांच्याबरोबर झाला आहे.
सचिन पायलट यांना गोंदियाला जायचे होते. परंतु ते पोचले गडचिरोलीला. हेलिकॉप्टरमधील वैमानिकाच्या चुकीमुळे हा प्रकार घडला. या 'किस्सा'ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगू लागली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलाय. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीचे देशभरातील नेते महाराष्ट्रात येत आहे. त्यांचे दौरे वाढले आहे. वाहनांच्या ताफा, विमान आणि हेलिकॉप्टरच्या घिरट्या वाढल्या आहेत. यातून मतदारांपर्यंत पोचण्यासाठी टायमिंग साधलं जात आहे.
सचिन पायलट काँग्रेस (Congress), महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहे. हेलिकॉप्टरने दौरे वाढवले आहेत. परंतु हेलिकॉप्टर वैमानिकाच्या चुकीमुळे ते गोंदिया ऐवजी गडचिरोलीतील आरमोरीमध्ये लँड झाले. विशेष म्हणजे, आरमोरीमध्ये कन्हैया कुमार येणार होते. यासाठी हेलिपॅड सज्ज होते. मात्र, सचिन पायलट यांच्या हेलिकॉप्टरने लँड झालेल्या हेलिपॅडवरून पुन्हा उड्डाण घेत अन् गोंदियाकडे रवाना झाले.
नागपुरातून सचिन पायलट हेलिकॉप्टरने गोंदियामधील मोरगाव अर्जुनीसाठी इथं जायचं होते. परंतु ते गडचिरोलीला पोचले. तिथं कन्हैया कुमार येणार होते. कन्हैया कुमार यांच्या स्वागतासाठी गडचिरोलीतील हेलिपॅडवर काँग्रेस नेते सज्ज होते. परंतु हेलिकॉप्टरमध्ये सचिन पायलट यांना पाहून त्यांना चकित झाले. दरम्यान हेलिकॉप्टर वैमानिकाला आपण चुकीच्या ठिकाणी लँड झाल्याचे लक्षात आले. सचिन पायलट यांनी देखील खात्री करण्यासाठी आरमोरीमधील काँग्रेस नेत्यांशी चर्चा कली. यानंतर तिथून ते गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीसाठी रवाना झाले. चुकीच्या लँडिंगमुळे सचिन पायलट यांना मोरगाव अर्जुनीच्या सभेसाठी सुमारे तीन तास उशिरा झाला.
गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीमधील सभेत सचिन पायलट यांनी भाषणात चुकीच्या लँडिंगचा किस्सा सांगितला. पायलट यांनी सभेला उशीरा येण्याचे कारण सांगत, क्षमा मागितली. हेलिकॉप्टर वैमानिकाने आम्हाला दुसऱ्याच ठिकाणी उतरवलं. दुसऱ्या सभेच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवलं. निवडणुकांच्या दरम्यान होतंच, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.