Mlc Kapil Patil Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Assembly Winter Session 2023 : मराठी तरुणांना बिहारमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या! आमदाराचा दावा

Maharashtra Assembly Session Mlc Kapil Patil On Teachers Job : शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा विधिमंडळात मोठा दावा...

संपत देवगिरे- सरकारनामा ब्युरो

Nagpur Assembly Session 2023 : राज्य सरकारने कंत्राटी भरती रद्द करण्याची घोषणा केली खरी पण, मागच्या दाराने भरती सुरूच असल्याचा आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे. त्याचवेळी बिहार सरकारने शिक्षकांची भरती सुरू केली असून त्यात मराठी तरुणांना नोकऱ्या मिळत असल्याची बाब त्यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली.

शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी नियम 289 अंतर्गत आज शिक्षक भरतीचा प्रश्न उपस्थित केला. सभापतींनी तो फेटाळला. पण त्यावर चर्चा करण्यास परवानगी दिली. कर्मचारी भरती रखडल्याने बेरोजगारी वाढत आहे. मात्र, बिहारमध्ये सरकारी भरती सुरू आहे. त्यात चक्क मराठी तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या मिळत असल्याचे कपिल पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

आमदार पाटील म्हणाले, 'महाराष्ट्र सरकारने नऊ एजन्सी मार्फत कंत्राटी भरती करण्याचा निर्णय मागे घेतल्याची घोषणा केली. परंतु, मागच्या दाराने अशी भरती सुरूच आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात बाह्य यंत्रणेमार्फत भरती झाली. त्यात समान काम, समान वेतन आणि किमान वेतन कायद्याचेही उल्लंघन झाले.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशासकीय तसेच अनुदानित खासगी शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरतीचा निर्णय मागे घेतलेला नाही. बिहारमध्ये एक लाख वीस हजार शिक्षक, शिक्षकेतर नोकऱ्यांची भरती झाली. त्यात लोकांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या. बिहार सरकार हे करू शकते तर, महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही? महाराष्ट्रात तातडीने भरतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी कपिल पाटील यांनी केलीय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT