Ravi Rana : शिवसेना कुणाची?, हा वाद न्यायालयात सध्या सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे कार्यालयावरुन शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांना भिडले आहेत. बुधवारी मुंबई महापालिके शिवसेनेच्या कार्यालयावरुन दोन्ही गटात राडा झाला. अखेर शिंदे गटाने हे कार्यालय ताब्यात घेण्यात यश मिळवले. आता शिवसेना भवन ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
यावरुन राजकारण पेटलं आहे. या वातावरणात आमदार रवी राणा यांनी ठिणगी टाकली आहे, त्यामुळे येत्या काही दिवसात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. "शिवसेना भवन शिंदे गट लवकरच ताब्यात घेईल," असा दावा रवी राणा यांनी केला आहे. रवी राणा हे नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
रवी राणा म्हणाले, "शिवसेना भवनाचा ताबा लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल. शिवसेनेच्या नावाने शिवसेना भवन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास 80 ते 90 टक्के पक्षाचे पदाधिकारी, नेते , 40 आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे स्वतः शिवसेना भवनाची चावी देतील. एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे कायदेशीररित्या त्यांना हे करावेच लागेल,"
रवी राणा यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. "उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा विचार सोडला आहे. ठाकरे हे काँग्रेस विचारसरणीचे आहे.ते सोनिया गांधींचे झाले असून त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली आहे," असे राणा म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवर टीका
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील रेशीमबाग कार्यालयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडून डॉ. हेडगेवारांना अभिवादन करण्यात आले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.