Winter Session 2022 : अधिवेशनात 'या' दोन विषयावर एकही प्रश्न विचारला नाही ; शिवसंग्रामची खंत

Maharashtra Assembly Winter Session 2022 : मेटे यांच्या निधनानंतर मराठा आरक्षण आणि शिवाजी महाराज यांचे मुंबईतील आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक हे विषय आता पोरके झाले.
Jyoti Mete, Vinayak Mete Latest News
Jyoti Mete, Vinayak Mete Latest NewsSarkarnama

Winter Session News: शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले आहे. विधान परिषदेच्या एका आमदाराने राजीनामा देऊन विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे (Jyoti Mete)यांना आमदारकी देण्यात यावी,अशी मागणी शिवसंग्रामने गुरुवारी केली आहे.

शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष उदयकुमार आहेर व शिवसंग्रामचे प्रवक्ते तुषार काकडे यांनी आज ही मागणी केली आहे. मेटे यांच्या निधनानंतर मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईतील आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक हे विषय आता पोरके झाले असल्याचा खेद यावेळी व्यक्त करण्यात आला.

अधिवेशनाच्या उर्वरित काळात हे दोन्ही विषय आमदार मांडतील, अशी अपेक्षा आहेर, काकडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.विधिमंडळात शिवसंग्रामचे दोन आमदार आहेत त्यांनी हे विषय मांडावेत, असे त्यांनी सांगितले. भारती लव्हेकर आणि भीमराव केराम यांच्याकडे देखील आम्ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बाकी आमदारांनी हे प्रश्न विचारले नाहीत, याचे दुःख आहेच, पण आमच्या आमदारांनी हे नाही विचारले याचे जास्त दुःख आहे, अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. नागपूरमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईतील आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक याविषयावर एक प्रश्नही विचारला नाही, अशी खंत शिवसंग्रामने व्यक्त केली आहे.

Jyoti Mete, Vinayak Mete Latest News
BMC NEWS : कार्यकर्त्यांचा राडा टाळण्यासाठी मुंबई महापालिकेनं उचलले 'हे' मोठे पाऊल

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे.आज (गुरुवारी) विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. गुवाहाटीला चला तुम्ही, सुरतेला चला.. खोक्यांनी लुटा, कधी खोऱ्याने लुटा..., अशा घोषणा देत विरोधकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावू धरली. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार (ajit pawar)यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.

Jyoti Mete, Vinayak Mete Latest News
Ajit Pawar : अब्दुल सत्तारांच्या उत्तरावर अजितदादांचे प्रश्नचिन्ह, म्हणाले..

"अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे ठेवलं. ते जयंत पाटी यांना द्यायला हवं होतं. येत्या 2024 निवडणुकीत अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होईल," असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजितदादांना चिमटे काढले होते. त्यानंतर अजित पवारांनी गुरुवारी विधानभवन परिसरात त्यांना प्रत्युत्तर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com