Ambadas Danve Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Assembly Winter Session 2023 : या सरकारची दाऊदच्या नातेवाईकांना साथ; गंभीर आरोप करत विरोधकांचा सभापतींवर संताप

Sachin Fulpagare

Nagpur Assembly Session 2023 : विधानपरिषदेतील कामकाजावरून विरोधी पक्षांनी सभापतींवर गंभीर आरोप केला आहे. मंत्री गिरीश महाजनांविरोधात बोलण्याचा प्रयत्न केल्यावर सभापती आमची भूमिका ऐकून घ्यायला तयार नाहीत. अतिशक एककल्लीपणे सभागृह चालवले जात आहे, असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला.

अंबादास दानवे, अनिल परब, काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि भाई जगताप यांनी नागपूर अधिवेशनात पत्रकारांशी संवाद साधला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सख्खा भाऊ असलेला इकबाल कासकर याच्या एकमद घरातलं लग्न नाशिकमध्ये झालं. या लग्नात भाजपचे मंत्री गिरीश महाजन, त्यांचे आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे आणि पदाधिकारी हजर होते. त्यांचे जेवतानाचे फोटोही आहेत. या विषयावर चर्चा होत असताना शिवसेनेचे (ठाकरे गट ) पदाधिकारी सुधाकर बडगुजर आणि सलिम कुत्ता यांचे संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. हे आरोप बडगुजर यांनी आरोफ फेटाळले आहेत. नाशिकच्या लग्नाला भाजपचे लोक हजर होते. यावर सभापती आमची भूमिका ऐकून घ्यायला तयार नाहीत. अतिशय एककल्लीपणे सभागृह चालवलं जात आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

शहर-ए-खतिब यांच्या आमंत्रणावरून भाजपचे मंत्री आमदार लग्नाला गेले होते. पण रातोरात ही पत्रिका बदलवण्यात आली. शहर-ए-खतिब यांच्या ऐवजी कासकरांच्या आमंत्रणावरून हे सगळे लोक लग्नाला गेले होते. हे सरकार दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकांना पाठिंबा देतंय. दाऊदला आणि त्याच्या नातेवाईकाला साथ देतंय, असं दानवे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे इकबाल मिर्चीबरोबर व्यवहार करणारे प्रफुल पटेल यांना चालतात. दाऊदशी संबंध असलेल्या नवाब मलिकांची बाजू हे सरकार घेतं. ज्यावेळीस आमच्यासोबत होते, त्यावेळी मलिक देशद्रोही होते. पण ज्या पद्धतीने दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला भाजपचे लोक हजर आहेत. हा भाजपचा दुटप्पीपणा उघड झाला पाहिजे. भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभात सहभागी होतात. असं असताना सभागृहात भाई जगताप, सतेज पाटील, एकनाथ खडसे आणि अनिल परब यांना बोलू दिले गेले नाही. पण ज्यांचा संबंध नाही, त्या मंत्र्यांना बोलण्याची परवानगी सभापती देतात. याचा अर्थ सभापती नियमबाह्य सभागृहाचं कामकाज चालवत आहेत, अस ते पुढे म्हणाले.

एकांगीपणे सभागृह चावलं जात आहे. दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नात हजर असलेल्यांना बोलण्याची संधी देतात. म्हणजे दाऊद इब्राहिमला साथ देणाऱ्यांना सहकार्य केलं जातं. आम्ही प्रयत्न केला तर प्रश्न विचारू दिला जात नाही, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT