अकोला : ''राज्यात कोळश्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. दोन दिवस पुरेल एवढाच साठा सध्या शिल्लक आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत वीजेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीजेचे उत्पादन कमी झाल्यास भारनियमन करावे लागेल,'' असे राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी स्पष्ट केले.
महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण नितीन राऊत (Nitin Raut)यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
नितीन राऊत म्हणाले, '' कोरोनाच्या काळात आणि लॉकडाऊनमध्ये सातत्याने वीज पुरवठा केला गेला. त्यानंतर चक्रीवादळ, महापुर या ठिकाणी वीजेचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला गेला. देशात आणि विदेशात सुद्धा कोळशाची टंचाई मोठ्या प्रमाणात असताना बाहेरुन मोठ्या दराने वीज खरेदी करुन त्याचा पुरवठा केला आहे. वीजेचा प्रश्न हा अत्यंत बिकट झालेला आहे,''
''वीज निर्मितीसाठी पाणी आणि अन्य महत्वाच्या गोष्टींसह त्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागतो. त्यामुळे आम्ही ज्यांच्याकडून वीजेची खरेदी केली जाते आणि नागरिकांना वितरीत करण्यात येते त्यासाठी तर पैसे लागतातच ना,'' असा टोला राऊतांनी लगावला. ग्राहकांनी वीजेचे बिल वेळेवर भरावे असे आवाहन त्यांनी केले.
''कोरोना काळात सर्वत्र ताळेबंदी असताना महावितरणकडून राज्यातील जनतेला अखंडित वीज पुरवठा करण्यात आला. कोरोनामुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले याची आम्हाला कल्पना आहे. पण जर वीज वापरली असेल तर येणाऱ्या देयकाचे पैसे भरावेच लागेल,'' वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करा,'' असे आवाहन राऊतांनी यावेळी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.