Harshawardhan Sapkal 
विदर्भ

Maharashtra Congress: विधानसभेला 75 लाख मतदार वाढले, काँग्रेसनं उचललं मोठं पाऊल! मतदार याद्यांबाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra Congress : विधानसभा निवडणुकीत मॅचफिक्सिंग झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. लोकसभेनंतर विधानसभेला पाच महिन्यांतच वाढलेल्या मतदारांच्या संख्येवर शंका व्यक्त केली होती.

Amit Ujagare

Maharashtra Congress: विधानसभा निवडणुकीत मॅचफिक्सिंगचा आरोप लोकसभेनंतर केवळ पाचच महिन्यात ७५ लाख मतदार वाढले कसे? असा प्रश्न उपस्थित करत संसदेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला सातत्यानं धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं मोठं पाऊल उचललं असून मतदार याद्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

दिल्लीतल्या बैठकीत झाला निर्णय

दिल्लीत झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्व जिल्हा, शहरांध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. याकरिता मतदार याद्यांचा ‘ॲप'चा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी दिल्लीत पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.

नेमकी काय झाली चर्चा?

या बैठकीत प्रामुख्यानं विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदार याद्यांमधील घोळांवर चर्चा करण्यात आली. प्रत्येकच विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार वाढले आहेत. यांपैकी काही मतदार बोगस असल्याची शंका आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघात मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील कामगारांना मतदार केले असल्याचा आरोप यापूर्वीच काँग्रेसच्या नेतृत्वाने केला आहे. फक्त आधारकार्ड घेऊन मतदार नोंदणी केल्याचा काँग्रेसचा दावा आहे. राहुल गांधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातही बोगस मतदान झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता.

बोगस मतदानाची शंका

नव्या मतदारांसोबत प्रत्येक मतदारसंघात सात ते आठ हजार मतदारांची नावं वेगवगेळ्या याद्यांमध्ये आहे. त्यांच्या माध्यमातून बोगस मतदान होत असल्याची शंकाही काँग्रेसला आहे. महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ही संख्या प्रभावी ठरू शकते असा भीती बैठकीत वर्तविण्यात आली. त्यामुळं आता स्थानिक निवडणुकांना सामोरं जाताना सर्व काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांना मतदार याद्यांची अतिशय बारकाईनं पडताळणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. मतदार यादीचं ॲप आहे, त्याचीही मदत घेण्यास सांगण्यात आलं आहे. ७ जुलैला मुंबई काँग्रेस कमिटी आणि पदाधिकाऱ्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. त्यानंतर विभागीय मेळाव्यांना सुरुवात केली जाणार असल्याचं काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT