Nana Patole: "मोदी भाजपवाल्यांचे बाप असतील, शेतकऱ्यांचे नाही"; लोणीकरांचा दाखला देत नाना पटोलेंचा उद्रेक

Assembly Monsoon Session Nana Patole Suspended : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वीच बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद यावेळी सभागृहात उमटले.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Assembly Monsoon Session Nana Patole Suspended : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर तासाभरातच शेतकऱ्यांचा मुद्दा काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी जोरदार मांडला. काही दिवसांपूर्वीच बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे यावेळी सभागृहात पडसाद उमटले. नाना पटोले यांनी मोदींचा उल्लेख करत भाजप नेत्यांना टार्गेट करत स्वतः एक वादग्रस्त विधान केलं.

Nana Patole
Assembly Session : विधानसभेत पहिल्या तासातच प्रचंड गोंधळ; अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन राजदंडाला हात लावणाऱ्या पटोलेंवर निलंबनाची कारवाई

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नाना पटोले बोलण्यासाठी उभे राहिले. यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर बोलताना नाना पटोले यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा मांडयला सुरुवात केली. त्यानंतर पटोले म्हणाले, सभागृहाचे सदस्य लोणीकर आणि कृषीमंत्री हे सातत्यानं शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. हा अपमान आता राज्याचा शेतकरी अन्नदाता आता सहन करणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे. मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही. या पद्धतीनं जी वक्तव्ये येत आहेत त्याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे.

Nana Patole
Monsoon Assembly Session : राम कदम 'संतापले', उत्तर देताना नाना पटोलेही 'भडकले', विधानसभेत वातावरण तापलं; घडलं काय?

अध्यक्षांनी दिली समज

दरम्यान, नाना पटोले यांच्या या विधानानंतर एकच भडका उडाला. विरोधक अधिकच आक्रमक झाले, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोलेंना समज दिली की, तुमच्याकडून असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही, हे चुकीचं आहे. पण यानंतरही नाना पटोले हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. राहुल नार्वेकर सातत्यानं सांगत राहीले की हे बरोबर नाही. पण नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे आपल्या जागेवरुन उठून थेट अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाऊन हातवारे करुन आपला मुद्दा मांडत राहिले, त्यानंतर अध्यक्षांनी तात्काळ सभागृहाची बैठक ५ मिनिटांसाठी तहकूब केली.

Nana Patole
Maharashtra Assembly Session : बीड प्रकरणाचा तपास महिला IPS अधिकाऱ्याकडे, CM फडणवीसांची घोषणा

अखेर नाना पटोलेंचं निलंबन

यानंतर जेव्हा बैठक पुन्हा सुरु झाली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे इतर सदस्य देखील आक्रमक झाले. नाना भाऊंनी अशा प्रकारे अध्यक्षांवर धाऊन जाणं हे योग्य नाही, असं सांगत फडणवीसांनी नाना पटोलेंनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतरही नाना पटोले हे अध्यक्षांच्या खुर्चीसमोर उभा राहून सातत्यानं शेतकऱ्यांचा अपमान केल्याचं सांगत राहिले. त्यानंतर अखेर राहुल नार्वेकर यांनी सांगितलं की, सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारित नाना पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com