Vidarbha state demand Sarkarnama
विदर्भ

Vidarbha state demand : विदर्भ राज्याची चाहूल! नवीन विधानभवन, मुख्यमंत्री-मंत्र्यांच्या बंगल्यांसह पायाभूत विस्तारामागे नेमकं काय राजकारण?

Infrastructure expansion in Nagpur, including a new Vidhan Bhavan and ministers bungalows, has reignited the demand for a separate Vidarbha state : उपराजधनी नागपूरमध्ये नवीन विधानभवनासह विविध पायाभूत सुविधांमुळे विदर्भ राज्याची चर्चा रंगली असून, विदर्भवाद्यांनी देखील तिला उचलून धरलं आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra politics Vidarbha : महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये वाढलेल्या पायाभूत सुविधांमुळे, विदर्भ राज्याची चाहूल लागली आहे. तसा चर्चांनी देखील जोर पकडला आहे. परिसीमनच्या पार्श्वभूमीवर, होत असल्याने गेल्या काही वर्षांत, नवीन नागपूरसह अनेक उपनगरे जोडली जाऊन शहराचा विस्तार राजधानीसारखा झाला आहे.

दिल्लीतील नागरी समस्या, प्रदूषणामुळे देशाची राजधानी म्हणून नागपूरला घोषित करण्याची मागणी विदर्भवाद्यांकडून करण्यात आली. एक मे रोजी, महाराष्ट्र दिनी, या मागणीला विदर्भात, जोर चढाल्याने, चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरसह विदर्भातील पायाभूत सुविधांवर लक्ष वाढवलं आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयामुळे नागपूर देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे.

विधान भवनाचा विस्तार, मुख्यमंत्री निवासस्थानातील बदल, मंत्र्यांच्या बंगल्याचे पुननिर्माण, अधिकाऱ्यांसाठी आणि नव्या निवासस्थानांची उभारणी आणि वाढत्या पायाभूत सुविधांचा नागपूरमध्ये (Nagpur) वेग वाढला आहे. समृद्धीमुळे नागपूरला वेगळे दिसत आहे. यातच शक्तिपीठ महामार्गाची निर्मिती देखील होत आहे.

नागपूर विधानभवनाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने 662.89 कोटींसह अतिरीक्त 339.78 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नवीन विधानभवन इमारतीत 400, विधान परिषदेत 120 आणि सेंट्रल हाॅलमध्ये 700, अशी आसनक्षमता असणार आहे.

मुंबईत सेंट्रल हाॅल असताना, नागपूरमध्ये त्याची उभारणी केली जात असल्याकडे अनेक विदर्भवाद्यांनी लक्ष वेधलं आहे. विधानभवनात पार्किंगसाठी प्रशस्त आणि सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे.

रवीनगरमध्ये अधिकाऱ्यांसाठी 15 मजली इमारती मंजूर झाली आहे. हैदराबाद हाऊसमधील जुन्या बॅरेक्सचे सुदृढीकरणाचा प्रस्ताव आहे. सुयोग गेस्ट हाऊसची क्षमता देखील वाढवली जाणार आहे. रवीनगरमध्ये अधिकाऱ्यांसाठी इमारत, रवी भवन उन्नतीकरण, रामगिरीमध्ये मीटिंग हाॅल आणि नाग भवनचा मेकओव्हर होत आहे. यासाठी एकूण 185.25 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

नागपूरमध्ये सर्व पायाभूत सुविधा विकसित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे डाॅ. संजय खडक्कार यांनी, हे एका राज्याच्या राजधानीसाठी अत्यंत योग्य आहे. दिल्लीत वाढते प्रदूषण आणि सामरिक समस्या पाहता नागपूरला देशाची राजधानीच बनवून टाकायला हवे, अशी मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT