Congress Shiv Sena deal : अंबादास दानवेंच्या बदल्यात ‘राजकीय डील’ पक्की? काँग्रेस-ठाकरे समीकरणात '2028'चा मास्टरप्लॅन!

Congress secures long-term political advantage by allocating one MLC seat to Shiv Sena Uddhav Thackeray faction, eyeing strategic gains in 2028 Rajya Sabha and Legislative Council elections : विधान परिषदेच्या एक जागेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्षाबरोबर काँग्रेसने मोठी राजकीय डील यशस्वी केल्याचे चित्र आहे.
Congress Shiv Sena deal
Congress Shiv Sena dealSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Legislative Council election : विधान परिषदेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने अंबादास दानवे यांना उमेदवारी फिक्स केली. मविआशी चर्चा न करताच, शिवसेना उद्धव ठाकरे सेनेकडून ही उमेदवारी जाहीर झाल्याने, काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आणि थेट उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी केली. यामुळे 'मविआ'त चांगलाच राजकीय पेच निर्माण झाला.

यानंतर शिवसेना ठाकरे सेना अन् काँग्रेसमध्ये वाटाघाटी सुरू होऊन, 2028मध्ये मोठी 'राजकीय डील' काँग्रेसने यशस्वी केल्याचे सांगितले जाते.

शिवसेना (ShivsenaUBT) उद्धव ठाकरे सेना पक्षाला आज देऊ केलेल्या विधान परिषदेच्या मोबदल्यात, 2028 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये दोन जागा मागितल्या आहेत. विधान परिषदेच्या 10, मुंबई स्थानिक मतदारसंघाच्या दोन जागा आणि राज्यसभेचीही निवडणूक 2028 मध्ये होणार आहे. काँग्रेसने यात दोन जागांची मागणी, शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्षाकडे लावून धरली.

शिवसेना उद्धव ठाकरे सेना देखील अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी, 2028मधील विधान परिषदेच्या दोन जागा देण्याचे मान्य केले आहे. ही राजकीय डील यशस्वी झाल्याचा निरोप देखील प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना दूरध्वनीवरून दिली.

Congress Shiv Sena deal
Vivek Kolhe MLC candidature : बावनकुळेंचा कोल्हेंसाठी विधान परिषदेचा पुनरूच्चार; अमितभाई अन् कार्यकर्त्यांच्या मनातलं ओळखलेलं अजितदादांचं 'ते' विधान!

विधान परिषदेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर, 'मविआ'तील काँग्रेस आक्रमक झाली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस देखील उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. एकप्रकारे काँग्रेसने 'मविआ'तील शिवसेना ठाकरे सेनेला आव्हानच दिले.

Congress Shiv Sena deal
Maharashtra Legislative Council election : विधान परिषदेसाठी काँग्रेसमध्ये ‘हाफ डझन’ स्पर्धा; सपकाळ दिल्लीत तळ ठोकून! थोरात-सावंतांसह 6 दिग्गज रिंगणात?

काँग्रेसने गेल्या महिन्याभरात तीन वेळा निवडणुकीतून माघार घेतला आहे. यामुळे महिन्याभरात काँग्रेसच्या माघारीची हॅट् ट्रिक झाली आहे. राज्यसभा, बारामती विधानसभा पोटनिवडणूक आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली आहे.

परंतु, आता काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची यशस्वी राजकीय डील केल्याचे सांगितले जात आहे. विधान परिषदेची आमदारकी शिवसेना ठाकरे पक्षाकडे गेली. परंतु 16 आमदार असलेल्या काँग्रेसच्या पदरी काहीच पडले नाही. आता 2028च्या निवडणुकीत राज्यसभेची आणि विधान परिषदेची एक, अशा दोन जागा मिळतील, अशी ही यशस्वी राजकीय डील केल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com