Opposition leaders announce a boycott of the government’s winter session tea invitation Sarkarnama
विदर्भ

Nagpur Assembly Session : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधक आक्रमक; सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्यासाठी आखली रणनीती...

Opposition boycott : हिवाळी अधिवेशनाआधी सरकारच्या चहापानाला विरोधकांनी बहिष्कार टाकत विरोधी पक्षनेता न देणे, संविधान आणि लोकशाहीचा अनादर केल्याचा आरोप केला. यामुळे अधिवेशनात संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Rajesh Charpe

Maharashtra Winter Session : हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. सत्ताधाऱ्यांच्या वतीने विरोधकांना चहापानासाठी निमंत्रण देण्यात आले होते. मात्र ते विरोधकांनी फेटाळून लावले. संविधानानुसार विधान परिषद आणि विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद देणे क्रमप्राप्त आहे. मात्र हे सरकार संविधान मानत नाही, घटना मानत नाही आणि लोकशाहीसुद्धा मानत नसल्याने आम्ही सरकारच्या चहापानाला जायचे नाही असे ठरविल्याचे नेत्यांनी सांगितले.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधकांचा पवित्रा बघता हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेत्याच्या नियुक्तीवरून सरकारक आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता दिसून येते आहे.

आम्हाला चहापानाला बोलावून फोटो काढून घ्यायचे आणि आम्ही सोबत असल्याचे दर्शवून आमचीच बदनामी करण्याचा सरकारचा डाव आहे. विरोधीपक्ष नेता निवडण्यासाठी घटनेमध्ये विरोधक आमदारांची संख्या 10 टक्के असावी हे साफ खोटे आहे. आम्ही याबाबत लेखी व कायदेशीर माहिती मागितली होती. विधिमंडळ सचिवांनीसुद्धा असा कुठलाच नियम नसल्याचे आम्हाला पत्र दिले आहे.

यापूर्वी विरोधक पक्षाच्या आमदारांची संख्या सहा आणि दहा असतानाही त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले. आमची संख्या कमी आहे मात्र सत्ताधाऱ्यांची पापे जास्त आहेत.ते बाहेर काढल्या जातील म्हणून महायुती सरकाराला विरोधी पक्षनेता नियुक्तच करायचा नसल्याचे यावेळी भास्कर जाधव यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी एक आमदार या नात्याने आम्हाला चहापानाचे वैयक्तिक निमंत्रण दिले. पत्रात महाराष्ट्राची गौरवशाली परंपरेचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र ही परंपराच तुडवण्याचे काम सत्ताधाऱ्यांमार्फत सुरू आहे. सभागृहात मंत्री उत्तर देत नाहीत. सर्वांची एकत्रित उत्तरे देऊन टाळाटाळ केली जात आहे.

गेल्या काही वर्षांत बिल्डरांच्याच लक्षवेधी अधिक लागतात. सरकार बोलते एक आणि करते दुसरे असा आरोप करून विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. यावेळी आमदार अनिल परब, आमदार अभिजित वंजारी, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT