Eknath Shinde MLA : एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा पोलिसांवर 'अविश्वास'? EVM स्ट्राँग रुमबाहेर सुरक्षेसाठी स्वतःची यंत्रणा!

Maharashtra election controversy News : राज्यातील नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही ठिकाणी जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळाली.
Evm Strong room
Evm Strong room Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडले. मात्र, त्याच दिवशी नागपूर खंडपिठाचा निर्णय आला व रखडलेल्या 20 नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 21 डिसेंबरला एकत्रित मतमोजणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ऐनवेळी मतमोजणी लांबणीवर पडली. सर्वच राजकीय पक्षाची मतमोजणी लांबणीवर गेल्याने धाकधूक वाढली आहे. त्यातच काही ठिकाणी EVM स्ट्राँग रुमबाहेर सुरक्षेसाठी स्वतःची खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यातच आता सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदाराने भडगाव आणि पाचोरा या ठिकाणाच्या स्ट्राँग रुमला स्वतःची खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा पोलिसांवर विश्वास नाही का? अशी चर्चा जोरात रंगली आहे.

राज्यातील नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत काही ठिकाणी जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळाली. तर दुसरीकडे या दोन पक्षातच निवडणूक काळात आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. ही निवडणूक चुरशीची होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता भाजपकडून ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाण्याची शक्यता असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.

Evm Strong room
BJP Vs Congress : 1 लाख मतांनी जिंकलेल्या भाजप आमदाराकडेही पक्ष प्रवेशासाठी रांगा : काँग्रेसचा सुपडासाफ करण्याचा दावा

त्यातच आता सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा प्रशासन-पोलिसांवर भरोसा दिसत नाही. भडगाव आणि पाचोरा या ठिकाणाच्या स्ट्राँग रुमला पाटील यांनी स्वतःची खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. यामुळे मात्र जिल्ह्यात राजकीय चर्चा जोरात रंगली आहे. नगरपालिका निवडणुकीत पाचोरा आणि भडगाव या दोनही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाविरुद्ध भाजप (BJP) असा जोरदार सामना रंगला आहे. या ठिकाणी या दोन पक्षातच जोरदार चुरस आहे.

Evm Strong room
Shivsena UBT : मातोश्री अन् शिवसैनिकांना गृहीत धरू नका! जागांचा आकडा सांगत कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखांनी थोपटले दंड

जळगाव जिल्ह्यातील भडगाव आणि पाचोरा येथील ईव्हीएम स्ट्राँग रूमच्या सुरक्षेला अनपेक्षित वळण मिळाल्याचं दिसत आहे. या दोन्ही ठिकाणी सरकारी सुरक्षा यंत्रणेसह गणवेशधारी खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आपल्या उमेदवारांच्या आग्रहास्तव हे खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.

Evm Strong room
Congress Thackeray Alliance : राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी; काँग्रेसच्या देशपातळीवरील मातब्बर नेत्याचे ठाकरेंशी गुफ्तगू, मनसेवर फैसला?

दोन्ही शहरांमध्ये नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार सामना रंगलेला असताना खासगी सुरक्षा रक्षकांची तैनात आता राजकीय चर्चेचा मुख्य मुद्दा ठरत आहे. अधिकृत चोख पोलिस बंदोबस्त असतानाही सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने स्वतंत्र सुरक्षा रक्षक नेमल्याने ईव्हीएम सुरक्षिततेबाबत नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्ट्राँग रुम बाहेर नेमलेले सुरक्षारक्षक येथील परिसरावर करडी नजर ठेवून आहे. एकंदरीत या सर्व घडामोडींमुळे निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता मात्र वाढली आहे.

सीसीटीव्ही कॅमेराचा डिस्प्ले अडीच तास बंद

जळगावच्या एरंडोल येथे स्ट्राँग रूमच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचा डिस्प्ले अडीच तासापर्यंत बंद पडल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराबाबत एरंडोल नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप तसेच शंका उपस्थित करत निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली आहे. तर जळगावच्या धरणगावमध्ये विरोधी पक्षाचे कार्यकर्ते स्वतःच स्ट्राँग रूमच्या बाहेर पहारा देताना दिसत आहेत. राज्यभर कमी अधिक प्रमाणात हिच परिस्थिती दिसत आहे.

Evm Strong room
BJP Vs Congress : 1 लाख मतांनी जिंकलेल्या भाजप आमदाराकडेही पक्ष प्रवेशासाठी रांगा : काँग्रेसचा सुपडासाफ करण्याचा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com