Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Mahavikas Aaghadi News : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी गुवाहाटीला गेल्याचा आनंद ; अपक्ष आमदाराचं मोठं विधान

MLA Kishor Jorgewar Big Statement : विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला पाठिंबा राहील असे सांगून राज्यातील महाविकास आघाडी सरकार घालवण्यासाठी गुवाहाटीला गेल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.

Pradeep Pendhare

Mumbai News : चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आम्ही गुवाहाटीला जाऊन सत्ता परिवर्तन केल्याचा आनंद आहे. महायुती सरकारच जनतेचे काम करत असून आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीबरोबर आहोत, अशी स्पष्ट भूमिका मांडली. विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे आहे.

यात नवाब मलिक वरिष्ठ सभागृहातील सदस्य असल्याने त्यांचे मत देखील निर्णय असणार आहे. त्यामुळे काहीही, असो मतांसाठी सर्वकाही महायुती करणार आणि महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार, असा दावा आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनी केला.

विधानसभा निवडणुकीला तीन ते चार महिने राहिले आहेत. राज्यात हे सरकार काम करत आहे. हे कोणी सांगायची गरज नाही. महिला, युवती, युवकांसाठी आणि घरगुती महिलांसाठी घेतलेले निर्णय सर्वांना माहित आहे. राज्यात महायुतीचे सरकार जनतेबरोबर आहे आणि हे सरकार आणण्यासाठी आणि जुने महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aaghadi Government) घालवण्यासाठी गुवाहाटीला गेल्याचा आम्हाला आनंद आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत सुरस आहे 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ह्या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवारच विजय होतील, असा विश्वास देखील किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी आयोजित केलेल्या बैठकीला हजेरी लावली आहे. यावर देखील किशोर जोरगेवार यांनी मत मांडले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आहेत. वरिष्ठ सभागृहातील सदस्य आहेत. त्यांच्यावर आरोप असले, तरी ते सभागृहातील सदस्य असल्यामुळे त्यांचे देखील मत निर्णयाक असणार आहे. कोणी त्यांच्यावर कसलेही आरोप असले, तरी त्या आरोपांमध्ये अजून तरी तथ्यता आढळली नाही. त्यामुळे मतांची जुळवा जुळवा करत असताना महायुतीत प्रत्येक मतासाठी लाचारी दिसत असली, तरी हे गणित महायुतीच्या नेत्यांना सोडवावेच लागणार, असल्याचे मत किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.

मिलिंद यांचा मेसेज आलाय....

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणुकीच्या रिंगणातील सर्व उमेदवार निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उमेदवार विजयी होतील, असे म्हटले होते. यावर संजय राऊत हे खूप मोठे नेते आहेत. परंतु त्यांना ग्राउंड लेव्हल वरची परिस्थिती माहीत नाही. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला तथ्य नाही. मला मिलिंद नार्वेकर यांचा मेसेज आला आहे असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT