Maharashtra ACB action latest news : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयामध्ये एसीबी पथकाने अचानक छापा घालत, कार्यालयातील दोघांना लाच घेताना पकडले.
यानंतर मंत्री झिरवळ यांचे कार्यालय सील करण्यात आले. एसीबीचे या कार्यवाहीमुळे मंत्री झिरवळ यांच्या अडचणी वाढल्याची राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या आहेत. यातच, काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकुर यांनी, मंत्री झिरवळ यांना बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र असू शकते, असा खळबळजनक दावा केला आहे.
काँग्रेसच्या यशोमती ठाकुर म्हणाल्या, "नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील क्लार्कला लाच घेताना पकडणे, हे भाजपचे (BJP) राजकीय षडयंत्र असू शकते. विरोधकांना आणि मित्रपक्षांना बदनाम करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करणे हा यांचा जुना धंदा आहे." स्वतः 'टक्केवारी'च्या चिखलात रुतलेल्या सरकारने दुसऱ्यावर चिखलफेक करू नये, असेही शेवटी टोला लगावला.
काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी आणलेल्या विशेष अविश्वास प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना, यशोमती ठाकुर यांनी भाजपचला चांगलंच डिवचलं आहे. राहुल गांधींची भाजपला भीती का वाटते? असा टोला त्यांनी लगावला.
'खासदार दुबेसारख्या व्यक्तीचा प्रस्ताव मंजूर होत असेल तर, आता हुकूमशाही आली आहे हेच म्हणावे लागेल. एवढी का भीती राहुल गांधी यांची, असा कोणता प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपने देशाला विकलं आहे. सभागृहातील महिला तुम्हाला चावणार होत्या का?पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला विश्वगुरू समजतात. पण साधी प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकत नाही. महिलांच्या आड लपण्याचा प्रयत्न मोदी करतात,' असा घणाघात यशोमती ठाकुर यांनी केला.
'या देशाचं राजकीय वेगळ्या स्वरूपामध्ये जात आहे, या गोष्टीचा निषेध आहे. एपस्टीन फाईल भाजपचे हरदीप पुरी यांच नाव सापडलं, त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही,' असा सवाल देखील यशोमती ठाकुर यांनी उपस्थित केला.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला 35 हजारांची लाच घेताना एसीबीने पकडले. लातूरमधील एका औषध दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला होता. हा परवाना पुन्हा पूर्ववत करण्यासाठी ढेरंगे यांनी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील 35 हजार रुपये सुरुवातीच्या टप्प्यात देण्याचे ठरले होते. हे पैसे ढेरंगे स्वीकारत असताना त्याला एसीबीच्या पथकाने पकडले. ढेरंगे याच्यासोबत मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील आणखी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. झिरवाळ यांचे खासगी सचिव (पीएस)रामदास गाडे यांच्याच सांगण्यावरुन आपण लाच मागितली, असा जवाब ढेरंगे यांनी दिल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.