Maharashtra Govt: बॅगा भरून ठेवा! 'या' विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या अटळच; प्रक्रिया केव्हा राबवणार?

Maharashtra Government Job Transfers News update: बदली प्रक्रियेत कुणालाही मुदतवाढ देऊ नका, बदली रद्द करु नका, बदलीच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा असे आदेशही सामान्य प्रशासन विभागानं संबधीत विभागाला दिले आहेत.
Maharashtra Government Job Transfers News update
Maharashtra Government Job Transfers News updateSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Government Transfers News: आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर किती पगार वाढणार यांची आकडेमोड करीत असतानाच सरकारी कर्मचाऱ्यांच्या हाती आता बदलीचा आदेश लवकरच पडणार आहे. एप्रिल महिन्यात बदली प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने मंत्रालयात याबाबतच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

नियमाप्रमाणे जे अधिकारी आणि कर्मचारी बदलीस पात्र आहेत, त्यांची यादी करण्यात आली असून त्यांच्या जागी पर्यायी अधिकारी- कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी आतापासूनच नियोजन करा, असा आदेश मंत्रालयातून देण्यात आला आहे. बदली टाळता यावी म्हणून केलेल्या विनंती पत्रांना प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे,

बदली प्रक्रियेत कुणालाही मुदतवाढ देऊ नका, बदली रद्द करु नका, बदलीच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा असे आदेशही सामान्य प्रशासन विभागानं संबधीत विभागाला दिले आहेत. त्यामुळे या वर्षी बदली टाळता येणे अशक्य आहे. वर्षानुवर्षं एकाच जागी असलेल्या सरकारी नोकरदारांना येत्या मार्च-एप्रिलमध्ये बदलीला सामोरं जावं लागणार आहे.

बदली प्रक्रियेनंतर नव्या नियुक्या, कार्यमुक्त होणारे कर्मचारी, यांच्याबाबत योग्य ते नियोजन करुन कामकाज सुरळीत सुरु राहील, बदल्यांमुळे सामान्य नागरिकांच्या कामात अडचणी येणार नाहीत, याची काळजी घ्या, असे  सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी मंत्रालयातील सर्व विभागांच्या मुख्य सचिवांना कळविले आहे.

Maharashtra Government Job Transfers News update
Ajit Pawar Death: प्रफुल्ल पटेलांमुळेच उशीर, अजितदादांनी बाय रोड जाण्याचा निर्णय का बदलला? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिनियम, 2005 अधिसूचित करण्यात आला आहे. यातील नियम 3, 4 नुसार, सर्व विभागांतील 6 वर्षे पूर्ण झालेल्या सह सचिव, उप सचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक-टंकलेखक, लघुलेखक संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबतची कार्यवाही एप्रिल-मे 2026 मध्ये करण्यात येणार आहे.

Maharashtra Government Job Transfers News update
ZP Election News: विजयाची चर्चा, जल्लोषही पण निकाल फिरला, पराभवानंतर थेट विजयी उमेदवाराच्या घरी जाऊन केले अभिनंदन!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने (GAD) एकाच ठिकाणी ६ वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत कडक भूमिका घेतली आहे.

कार्यकाळ

६ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया एप्रिल-मे २०२६ मध्ये राबवली जाणार आहे.

कोणत्या विभागातील कर्मचारी?:

सामान्य प्रशासन विभागांतर्गत येणाऱ्या मंत्रालयीन संवर्गातील सर्व विभागांमधील खालील कर्मचाऱ्यांना हा नियम लागू असेल:

  1. सह सचिव (Joint Secretary)

  2. उप सचिव (Deputy Secretary)

  3. अवर सचिव (Under Secretary)

  4. कक्ष अधिकारी (Section Officer)

  5. सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer)

  6. लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) आणि लघुलेखक (Stenographer)

मुदतवाढ नाहीच

वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीला कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही किंवा बदली रद्द केली जाणार नाही.

उद्देश: प्रशासकीय कामात होणारा विलंब टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी 'महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५' नुसार ही कारवाई केली जात आहे.

(अधिकृत शासन निर्णयांसाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या 'शासन निर्णय' (GR) पोर्टलवर जाऊन तपासू शकता)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com