Gadchiroli Operation_Myrter Police Constable Dipak Madavi_Devendra Fadnavsi 
विदर्भ

Gadchiroli Operation: गडचिरोलीत तीन दिवसांपासून मोठं ऑपरेशन सुरु; 7 नक्षलवादी ठार, 1 पोलीस शहीद

Gadchiroli Operation: मुख्यमंत्र्यांनी या मोहिमेत शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना सव्वा दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देखील दिली जाणार आहे.

Amit Ujagare

Gadchiroli Operation: गडचिरोलीच्या नारायणपूर या सीमावर्ती भागात गेल्या तीन दिवसांपासून नक्षलविरोधी मोहीम सुरु आहे. यामध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्र पोलीस दलातील C60 पथकाच्या धाडसी जवानांनी नक्षलवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत आत्तापर्यंत ७ नक्षलवादी ठार झाले आहेत. तर एक पोलीस कर्मचारी शहीद झाला. या दुःखद वृत्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.

फडणवीस म्हणातात, दुर्दैवाने या अभियानादरम्यान नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना आमचे C 60 पथकातील वीर जवान दीपक चिन्ना मडावी हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढून भामरागड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतू डॉक्टरांच्या प्रयत्नांची शर्थ सुरू असतानाच त्यांना वीरमरण प्राप्त झाले.

राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आणि नक्षलवादाला समूळ उच्चाटनासाठी दीपक मडावी यांनी दिलेली ही सर्वोच्च आहुती आम्ही कधीही विसरणार नाही, त्यांचं हे बलिदान कदापि व्यर्थ जाणार नाही. महाराष्ट्र पोलीस दल आणि शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात पूर्णतः सहभागी आहे.

मी शहीद जवान दीपक चिन्ना मडावी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची मदत आणि विविध लाभांसह एकूण ₹ 2.25 कोटी रुपये अर्थसहाय्य तसेच कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय नोकरी देण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT