PMC Recruitment: अधिक्षक अभियंतापदाची पदोन्नती रद्द करा! पुणे महापालिकेला हायकोर्टाचे आदेश

PMC Recruitment: महापालिकेनं व्यवस्थित निर्णय न घेतल्याने हा वाद न्यायालयात गेल्याने महापालिकेवर मोठी नामुष्की ओढवली आहे.
PMC Election 2026
PMC Election 2026Sarkarnama
Published on
Updated on

PMC Recruitment: पुणे महापालिकेत कार्यकारी अभियंता हुद्द्यावरील अधिकाऱ्यांना अधिक्षक अभियंता पदावर पदोन्नती देताना चुकीच्या कार्यपद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे अन्य अभियंते पदोन्नतीपासून वंचित राहिल्याने उच्च न्यायालयाने महापालिकेला दणका दिला आहे. महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्व पदोन्नती रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेत व्यवस्थित निर्णय न घेतल्याने हा वाद न्यायालयात गेल्याने महापालिकेवर मोठी नामुष्की ओढवली आहे.

PMC Election 2026
नोकरीला लागल्यानंतर वर्षभरातच मिळणार ग्रॅच्युएटी; पण किती, नियम काय?

पुणे महापालिकेतील १५ कार्यकारी अभियंत्यांना अधिक्षक अभियंता पदोन्नती देण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागापुढे होता. पण यामध्ये चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया राबविली जात असल्याने सेवाज्येष्ठता असूनही अन्याय होत असल्याची तक्रार काही अभियंत्यांनी प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर त्यांचे म्हणणे महापालिका प्रशासनाने ऐकून घेतले पण त्यानुसार सेवा ज्येष्ठता यादीत बदल केला नाही. चार कार्यकारी अभियंत्यांना अधिक्षक अभियंतापदी पदोन्नती देण्याचा निर्णय विभागीय पदोन्नती समितीने घेतला. त्यानंतर मुख्यसभेतही त्याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला अशा पाच अभियंत्यांनी उच्च न्यायालयात महापालिकेच्या विरोधात याचिका दाखल केली. त्यामध्ये चार अभियंत्यांना दिलेली पदोन्नती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

PMC Election 2026
Ghooskhor Pandat Row: 'घुसखोर पंडत'वरुन युपीच्या राजकारणात खळबळ! CM आदित्यनाथ अन् मायावती आले एकत्र; नेमका प्रकार काय?

पुणे महापालिका प्रशासनाने २०१९ पासून पदोन्नती प्रक्रियेत अनेक चुका केल्या आहेत. त्याबाबत अनेक तक्रारी असल्या तरी सामान्य प्रशासन विभागाकडून बदल केला जात नाही. अभियंता पदोन्नतीचा वाद २०२४ पासून सुरु असताना त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने नियम लावल्याने उच्च न्यायालयात महापालिकेच्या विरोधात निर्णय जाऊन पदोन्नती रद्द करावी लागली आहे. त्यामुळे आता यातील पात्र असलेल्या अभियंत्यांना पदोन्नती द्यावी लागणार आहे.

PMC Election 2026
Video: ओवैसींच्या नगरसेवकानं चक्क भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला केलं मतदान! कुठे घडला हा प्रकार? व्हिडिओ व्हायरल

सगळेच अधिकारी सावध

पुणे महापालिकेतील अभियंत्यांमधील पदोन्नतीचे भांडणे थेट न्यायालयात गेली आहेत. गेल्या सहा महिन्यापासून याचे पडसाद महापालिकेत उमटत होते. पण आता महापालिकेच्या विरोधात न्यायालयाने निर्णय दिल्याने सर्वच अधिकाऱ्यांनी या वादात पडायला नको म्हणत न बोलणे पसंत केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com