Mudhoji Raje Bhosale takes a different stand, opposing Maratha reservation under OBC quota. Sarkarnama
विदर्भ

Maratha Reservation update : जरांगेंना शुभेच्छा पण मागणीला विरोध! मुधोजी राजे भोसले यांनी घेतली वेगळी भूमिका

Manoj Jarange’s stand on Maratha reservation : मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात कौतुकास्पद काम केले आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे, असे मुधोजी राजे भोसले म्हणाले आहेत.

Rajesh Charpe

Mudhoji Raje Bhosale’s opposition to OBC quota demand : मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा आणि त्यातून समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी मनोज जरांगे मुंबईत उपोषणाला बसले आहेत. सोबतच त्यांनी सर्वांना कुणबी समाजाचे सरसकट प्रमाणपत्र द्यावे, अशीही मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीशी भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी असहमती दर्शवली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, तर वेगळ्या प्रवर्गातून द्यावे, असे मत त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केले.

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हवे आहे. त्यासाठी ओबीसीतून आरक्षण देण्याची गरज नाही, अशी भूमिका मुधोजी राजे भोसले यांनी स्पष्ट केली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शुभेच्छा देताना त्यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याचेही मुधोजी राजे भोसले यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात कौतुकास्पद काम केले आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. आता न्यायालयात टिकेल असेच आरक्षण मराठा समाजाला हवे आहे. त्यावर सर्व मराठा समाज ठाम असल्याचे मुधोजी राजे म्हणाले.

जरांगे यांच्या मागणीवरून मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण झाला आहे. जरांगे यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्‍यावतीने शनिवारपासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. गरज भासल्यास आम्ही मुंबईत कूच करू, असा इशाराही ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.

यापूर्वीसुद्धा जरांगे यांच्या विरोधात ओबीसी महासंघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते. दरम्यान, जरांगे यांनी मराठा समजाला स्वतंत्र आरक्षण नको असल्याचे सांगून ओबीसीतूनच द्यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुधोजी राजे भोसले यांनी जाहीर केलेली भूमिका महत्त्वाची मानली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT