
Anjali Damania and Congress Raise Allegations : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र निखिल व सारंग यांच्या कंपन्यांची सध्या जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियात या कंपन्यांच्या महसूलावरून जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही कंपन्यांच्या महसूलात अचानक घसघशीत वाढ झाल्याचा दावा केला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह काँग्रेसकडूनही त्याबाबतचे आकडे देण्यात आले आहेत.
अंजली दमानिया यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गडकरींच्या दोन्ही मुलांच्या (निखिल आणि सारंग गडकरी) यांच्या कंपन्यांची घोडदौड सुरुच आहे. मागच्या वर्षी 9 ऑगस्टला शेअरची किंमत 41 रुपये होती आणि आज 736 रुपये? SEBI काय करतंय?, असा सवाल दमानिया यांनी केला आहे.
केरळ काँग्रेसने काय म्हटलंय?
केरळ काँग्रेसने सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, तुम्ही जेव्हा E20 पेट्रोल टाकता तेव्हा तुम्ही कष्टाळू व्यक्ती निखील नितीन गडकरी यांना उदरनिर्वाहासाठी मदत करत असता. जून 2024 च्या तिमाहीत त्यांच्या कंपनी CIAN Agro चा महसूल फक्त 17 कोटी होता. एका वर्षात तो 511 कोटी झाला. फक्त 2905 टक्के ची छोटीशी वाढ झाल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.
गेल्या वर्षी जो स्टॉक 43 होता तो आता 668 आहे. म्हणून E20 भरत राहा, तुम्ही त्यांना वेगान वाढविण्यास मदत कराल आणि नव्या भारतात अभिमानाने योगदान द्याल. तुमचे इंजिन कदाचित बंद पडेल, परंतु त्या बदल्यात तुम्ही निखिल यांच्यासारख्या उद्योजकाच्या स्वप्नांना शक्ती देणार आहात. E20 भरत राहा, असा खोचक टोलाही केरळ काँग्रेसने लगावला आहे.
कर्नाटक काँग्रेसचीही पोस्ट
कर्नाटक काँग्रेसनेही सोशल मीडियात पोस्ट केली आहे. भारतात इथेनॉलच्या वापरावर मोठे प्रश्न, असे म्हणत काँग्रेसने पोस्टमध्ये लिहिले आहे की, निखिल गडकरी यांच्या मालकीच्या सियान अॅग्रो इंडस्ट्रीजचा महसूल जून 2024 मध्ये 18 कोटी रुपयांवरून जून 2025 मध्ये 523 कोटी रुपयांपर्यंत वाढला. शेअरची किंमत 2184 टक्के वाढली. या जैवइंधन तेजीचा फायदा कोणाला होत आहे?
2022 मध्ये सुधारित केलेल्या राष्ट्रीय जैवइंधन धोरणात (2018) 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, जे लवकर साध्य झाले. निखिल आणि सारंग गडकरी (मानस अॅग्रो इंडस्ट्रीजचे पूर्णवेळ संचालक) यांचे कौतुक. पण हा कौटुंबिक व्यवसायाचा विजय आहे की जनतेचा फायदा, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.