Chhagan Bhujbal, Manoj Jarange Sarkarnama
विदर्भ

Chhagan Bhujbal: बीडमध्ये दंगल घडविणारी माणसं जरांगेंचीच; भुजबळांचा हल्लाबोल

Maratha Reservation: आता सर्रास मराठा कुणबी होऊ लागले आहेत.

Mangesh Mahale

Nagpur Winter Session 2023: मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात आरक्षणावरुन वाद सुरु आहे. बीडची दंगल छगन भुजबळांनीच घडवून आणली. त्यांना बळ देऊ नका,असं आवाहन देखील जरांगेंनी राज्य सरकारला केलं आहे. भुजबळांनी जरांगेचा हा आरोप खोडून काढला त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

"मी बीडमध्ये जाऊन माझ्याच लोकांचं घर कसे जाळणार? जरांगेंचा आरोप बालिश आहे. अटक झालेली माणसं ही जरांगे यांचीच होती. माझा विरोध आरक्षणाला नसून जरांगेंच्या झुंडशाहीलाआहे. दंगल घडविणारी माणसं जरांगेंचीच होती," असा गंभीर आरोप भुजबळांनी केला आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीला माझा विरोध नाही पण आरक्षण देताना मुळ ओबीसींवर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी. आता सर्रास मराठा कुणबी होऊ लागले आहेत, खोटे कुणबी सापडू लागले आहेत. खोटे प्रमाणपत्र घेऊन लाभ घेणार नाहीत, आरक्षण देताना खऱ्या कुणबींवर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, असे भुजबळ म्हणाले. मी कुठल्याही महापुरुषाचा अपमान केला नाही, शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले माझे दैवत आहे, असे स्पष्टीकरण भुजबळांनी दिले.

जरांगे पाटलांनी आज (गुरूवारी) पुन्हा एकदा भुजबळांवर शरसंधान साधले. भुजबळांकडून विधानसभेत जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. भुजबळ हे विश्वासघातकी असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा डाव समजून घ्यावा, असे जरांगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, 17 डिसेंबरला आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेतली जाणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली.

भुजबळांनी सुड भावनेने मराठ्यांशी वागू नये. त्यांचे मराठ्यांनी काही त्रास दिला नाही. गर्दीचा उपयोग तुम्ही स्वत:साठी करून घेतला आहे. मी गर्दीचा उपयोग समाजासाठी करत आहे. आज 40 लाख मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले आहे, हा गर्दीचा विजय आहे. मला ओबीसींमधील 47 जातींचे नेते मला भेटायला आले होते. त्यांनाही वेगळे आरक्षण हवे, भुजबळ त्यांना खाऊ देत नाहीत, अशी टीका जरांगे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT