nagpur violence Sarkarnama
विदर्भ

Nagpur violence Update : नागपूर दंगलप्रकरणी मोठी अपडेट; एमडीपीच्या अध्यक्षानंतर कार्यकारी अध्यक्ष अन्‌ एका युट्यूबरला ठोकल्या बेड्या

Two Person Arrested : नागपूरमध्ये आठवडाभरापासून घडलेल्या घटनेमुळे तणावाची परिस्थिती आहे. अनेक वस्त्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. महाल आणि इतवारी ही नागपूरमधील सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आहे. तीसुद्धा पाच दिवसांपासून बंद आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 22 March : औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात नागपूरमध्ये झालेल्या आंदोलनानंतर तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी सुमारे बाराशे लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या दगंलीमागचा मास्टर माईंड म्हणून दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी मायनॉरेटी डेमोक्रेटिक पक्षाचा अध्यक्ष फहीम खान याला अटक केली होती. त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. आज या प्रकरणी आणखी दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. यात मायनॉरिटी डेमोक्रेटिक पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनिअर आणि यू ट्यूब चालवणारा पत्रकार मोहम्मद शहजाद खान यांचा समावेश आहे.

नागपूरमध्ये (Nagpur) आठवडाभरापासून घडलेल्या घटनेमुळे तणावाची परिस्थिती आहे. अनेक वस्त्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे महाल आणि इतवारी ही नागपूरमधील सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आहे. तीसुद्धा पाच दिवसांपासून बंद आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. पोलिसांना काही सूचना त्यांनी केल्या आहेत.

दुसरीकडे, काँग्रेस पक्षाने (Congress) या मागचे तथ्य जाणून घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या वतीने दंगलग्रस्त भागाची पाहणी केली जाणार आहे. संबंधित वस्त्यांमधील नागरिकांचे म्हणणे काँग्रेसचे नेते जाणून घेणार आहेत.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी (ता. 17 मार्च) आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांनी कुरणाचे आयात लिहिलेली हिरवी चादर जाळल्याचा आरोप झाला होता, त्यावरून मुस्लिमांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर रात्री महाल परिसरात दंगल उसळली होती.

काही समाजकंटकांनी तुफान दगडफेक केली. गाड्यांची जाळपोळ केली. पोलिसांवरसुद्धा हल्ले केले गेले. भाजपच्या नेत्यांनी ही दंगल पूर्वनियोजित होती, असे आरोप केले आहेत. मुस्लिम समाजानेसुद्धा या घटनेचा निषेध नोंदवला आहे. औरंगजेबाच्या कबरीशी आमचे काही देणेघेणे नाही, ती उखडून टायकची असेल तर टाका. मात्र, आम्हाला देशद्रोही ठरवू नका अशी भूमिका घेतली आहे.

या घटनेमागे बंगलादेशातील रोहिंग्याचे कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरून समाजकंटकांना चिथावणी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. सायबार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT