Phaltan Politic's : रणजितसिंह निंबाळकरांनी रामराजेंना दुसऱ्यांदा दिला धोबीपछाड; श्रीराम कारखान्यावर अखेर प्रशासकाची नियुक्ती

Shriram Sugar Factory Election : एकंदरीतच फलटणच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीनंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे यांना दुसऱ्यांदा धोबीपछाड दिली आहे. विधानसभा निवडणुकीत सचिन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऐनवेळी उमेदवारी मिळवित रामराजे गटाचे उमेदवार दीपक चव्हाण यांचा पराभव घडविला.
Ramraje Naik Nimbalkar-Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar-Ranjitsinh Naik Nimbalkar Sarkarnama
Published on
Updated on

Satara, 21 March : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा धोबीपछाड दिली आहे. फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेला राज्य सरकारकडून स्थगिती मिळविलेली असतानाच आता प्रशासकाची नियुक्ती करून रणजितसिहांनी रामराजेंवर पुन्हा एकदा बाजी पलटवली आहे. त्यासाठी त्यांना निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या भूमिकेचाही फायदा झाला.

फलटण (Phaltan) तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरळीतपणे व्हावी, यासाठी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर आणि राजे गट आग्रही होता. दरम्यान, साखर काखान्याच्या मतदार याद्यावरून तालुक्यात आरोप-प्रत्यारोप रंगले होते. निवडणूक सुरळीतपणे व्हावी, यासाठी रामराजेंचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.

राज्य सरकारने श्रीराम सहकारी कारखान्याच्या निवडणूक (Shriram Sugar Factory Election ) प्रक्रियेला स्थगित दिल्यानंतर निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी राज्य सरकारकडे कारखान्यावर प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. तसेच, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेही पडद्याआडून प्रयत्न सुरू होते. अखेर श्रीराम साखर कारखान्यावर फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Ramraje Naik Nimbalkar-Ranjitsinh Naik Nimbalkar
Solapur Bazar Samiti : मोहन निंबाळकरांना हायकोर्टाचा दणका; बारा दिवसांत फेरनियुक्तीवर आलेल्या प्रशासकाची 24 तासांत पुन्हा उचलबांगडी!

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या सदोष आहोत. सत्ताधाऱ्यांनी विशिष्ट गोष्टींचा मतदार याद्यांमध्ये जाणीवपूर्वक समावेश केलेला नाही, त्यामुळे श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी निवृत्त सनदी अधिकारी भोसले यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्याचबरोबर भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.

श्रीराम साखर कारखान्याची निवडणूक पारदर्शकपणे व्हावी. जे सभासद आहेत, त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध होतो. तसेच श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीस स्थगित द्यावी आणि कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होतो, असेही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

Ramraje Naik Nimbalkar-Ranjitsinh Naik Nimbalkar
Budget Session : मराठवाड्यातील ठाकरेंच्या शिलेदाराने दिली विधानसभेत थेट राजीनामा देण्याची धमकी

एकंदरीतच फलटणच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीनंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे यांना दुसऱ्यांदा धोबीपछाड दिली आहे. विधानसभा निवडणुकीत सचिन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऐनवेळी उमेदवारी मिळवित रामराजे गटाचे उमेदवार दीपक चव्हाण यांचा पराभव घडविला. विधानसभा निवडणुकीनंतर श्रीराम कारखान्यावर प्रशासक नेमून रामराजे गटाला दुसऱ्यांदा धोबीपछाड देण्यात निंबाळकरांना यश मिळविले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com