Solapur Bazar Samiti : मोहन निंबाळकरांना हायकोर्टाचा दणका; बारा दिवसांत फेरनियुक्तीवर आलेल्या प्रशासकाची 24 तासांत पुन्हा उचलबांगडी!

High Court stay Administrator Mohan Nimbalkar appointment : सोलापूर बाजार समितीच्या प्रशासकपदी पुन्हा नियुक्ती मिळाल्यानंतर मोहन निंबाळकर यांनी वेगवान हालचाली करत गुरुवारी (ता. 20 मार्च) सकाळीच पदभार स्वीकारला होता. मात्र, डॉ. बगले यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करून तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली.
Solapur Bazar Samiti
Solapur Bazar SamitiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 March : अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शिफारशीवरून अवघ्या 12 दिवसांत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. फेरनियुक्तीनंतर निंबाळकर यांनी गुरुवारी (ता. 20 मार्च) सकाळी धावपळ करत पदभार स्वीकारला. पण त्याला 24 तास पूर्ण होण्याच्या आधीच मुंबई उच्च न्यायालयाने दणका देत निंबाळकर नियुक्तीला स्थगिती दिली आहे, तसेच प्रशासकपदाचा पदभारही तातडीने सोडण्याचे आदेश दिले आहेत.

सोलापूर बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर (Mohan Nimbalkar) यांच्या कामकाजाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. बसवराज बगले यांनी पणनमंत्री आणि प्रधान सचिंवाकडे पुराव्यासह तक्रारी केल्या होत्या. तसेच, मुंबई उच्च न्यायालयातही तातडीची याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेत निंबाळकर यांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बाजार समितीच्या प्रशासकपदाचा कार्यभार पुन्हा एकदा सोलापूर शहर उपनिबंधक प्रगती बागल यांच्याकडे कायम ठेवण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याबाबत कोर्टाने सूचित केले आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची (Solapur Bazar Samiti) निवडणूक लांबल्यानंतर निंबाळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्ती हरकत घेऊन डॉ. बसवराज बगले यांनी निंबाळकर यांच्या नियमबाह्य कामाबाबत पणनमंत्री आणि प्रधान सचिवांकडे तक्रार करण्यात आली होती. त्याबाबत सरकारने पणन संचालकांचा खुलासा मागितला होता.

दरम्यान, निंबाळकरांनी सोलापूर जिल्हा उपनिबंधकांच्या परस्पर पत्रव्यहवार करून बेकायदा कामाचा सपाटा लावला होता, त्यामुळे उपनिबंधकांनीही त्यांच्याबाबत आरोपांचा अहवाल पाठवला होता. डाॅ. बगले यांची तक्रार आणि उपनिबंधकांचा अहवाल यामुळे सहकार आणि पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी निंबाळकर यांना पदावरून हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निंबाळकर यांची सोलापूर बाजार समितीच्या प्रशासक पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती.

Solapur Bazar Samiti
Budget Session : मराठवाड्यातील ठाकरेंच्या शिलेदाराने दिली विधानसभेत थेट राजीनामा देण्याची धमकी

सहकार आणि पणन विभागच्या सचिवांच्या आदेशानंतर उचलबांगडी झालेल्या मोहन निंबाळकर यांच्या जागी सोलापूर शहर उपनिबंधक प्रगती बागल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, निंबाळकरांनी आपले प्रशासकीय वजन वापरत अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची शिफारस मिळवित पणनमंत्र्यांच्या आदेशाने पुन्हा एकदा सोलापूर बाजार समितीच्या प्रशासकपदी नियुक्ती मिळविली हेाती. ही नियुक्ती अवघ्या बारा दिवसांत मिळविली होती. त्याची ‘अर्थ’पूर्ण चर्चा सोलापूर जिल्ह्यात होती.

सोलापूर बाजार समितीच्या प्रशासकपदी पुन्हा नियुक्ती मिळाल्यानंतर मोहन निंबाळकर यांनी वेगवान हालचाली करत गुरुवारी (ता. 20 मार्च) सकाळीच पदभार स्वीकारला होता. मात्र, डॉ. बगले यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करून तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली, त्यानुसार न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यापुढे शुक्रवारी सकाळी युक्तीवाद झाला.

Solapur Bazar Samiti
Gopichand Padalkar : जयंतराव; समोरासमोर येऊन वार करा,कशाला कुणाला पुढं करता; गोपीचंद पडळकरांनी पुन्हा ललकारले

जिल्हा उपनिबंधकांचा गंभीर व वस्तुनिष्ठ अहवाल, युक्तीवादातील मुद्दे, पुरावे आणि सरकारकडून झालेली चूक न्यायलयाच्या निर्दशनास आणून देण्यात आली. त्यानंतर न्यायमूर्ती बोरकर यांनी मोहन निंबाळकर यांच्या प्रशासकपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली, तसेच सरकारला निंबाळकरांच्या नियुक्तीबाबत दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय मोहन निंबाळकर यांना प्रशासकपदाचा कार्यभार तातडीने सोडण्याचा आदेश दिला आहे. डाॅ. बगले यांच्या वतीने ॲड. गुरबाळा बिराजदार यांनी युक्तीवाद केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com